कापसाची तेजी कायम ; दर आणखी वाढण्याची शक्यता… आज कमाल दर 10551 वर, पहा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी कापसाला मात्र सोन्याची झळाळी कायम आहे. कापसाच्या भावात तेजी राहण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या आठवड्यात सरकीच्या दरात वाढ होत आहे. आज कापसाचा दर देखील वधारलाय. गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर हे दहा हजारांवर स्थिरावले असले तरी भविष्यात मात्र कापसाला 13 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी कापूस उत्पादन किती झाले याचा अंदाज येतो यावरून दर काय राहणार हे सांगता येते पण घटलेल्या उत्पादनामुळे एप्रिल मध्ये कापसाला विक्रमी दर मिळेल असा अंदाज पणन महासंघाचे माजी व्यवस्थापक गोविंद वैराळे यांनी व्यक्त केला आहे.

कापसाचे दर हे कापसाच्या दर्जानुसार ठरवले जातात धाग्याची लांबी 29 मी मी पेक्षा अधिक असणाऱ्या, तसेच कापसाचा शुभ्रपणा 74 टक्के पेक्षा अधिक असल्यास त्या कापसाला चांगला दर मिळतो. आर्द्रतेचे प्रमाण हे नऊ टक्के पेक्षा कमी असावे लागतात. तर कचऱ्याचे प्रमाण हे 3 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास अशा कापसाला चांगला दर मिळतो. त्यामुळे कापसाची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.

दरम्यान दिनांक 19 फेब्रुवारी रोजी कापसाला कमाल दहा हजार तीनशे रुपये भाव मिळाला होता. तर हाच दर 20 फेब्रुवारी रोजी दहा हजार 500 वर गेला होता. आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार कापसाला कमाल दहा हजार 551 रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाचे 1950 क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान दर सात हजार 900 रुपये कमाल दर दहा हजार 551 तर सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 21-2-21 कापूस बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/02/2022
हिंगोलीक्विंटल30970099009800
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल4989550100009900
जामनेरहायब्रीडक्विंटल44802595679560
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल19507900105519400
20/02/2022
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल408000101009900
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल9679400101009700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल82770081007900
काटोललोकलक्विंटल250820098008600
भिवापूरलांब स्टेपलक्विंटल4828000105009250
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल27930095009400
नरखेडनं. १क्विंटल54950099009700
19/02/2022
भद्रावतीक्विंटल3517500100008750
समुद्रपूरक्विंटल2418200103009500
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल337900101009800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल2097100102009400
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल1008500100009500
किल्ले धारुरमध्यम स्टेपलक्विंटल10799001010710000
नरखेडनं. १क्विंटल98950099009700

Leave a Comment

error: Content is protected !!