पांढऱ्या सोन्याला झळाळी ; कापसाला मिळाला रेकॉर्डब्रेक 13,450 रुपयांचा भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कापसाच्या दारातली तेजी कायम असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात या पांढऱ्या सोन्याचा दर वाढता वाढता वाढे असाच राहिला आहे. या वर्षाच्या सुरवातीपासून कापसाच्या दारात तेजी जाणवत आहे. ही तेजी अद्यापही कायम आहे. नुकताच अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपयांचा भाव मिळाला होता. मात्र आता त्याचाही रेकॉर्ड मोडत सोमवारी दिनांक २८ मार्च रोजी कापसाला कमाल १३ हजार रुपयांचा दर प्रति क्विंटल करिता मिळाला आहे.

सोमवारी सिंदी(सेलू) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला कमाल 13450 इतका विक्रमी भाव मिळाला असून हा भाव यंदाच्या हंगामातील सर्वाधिक भाव आहे. सोमवारी या कृषी उत्पन्न बाजार समितीत लांब स्टेपल कापसाची 2222क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 8800,कमाल भाव 13450 आणि सर्वसाधारण भाव 13250 इतका मिळाला. त्यामुळे कापसाची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मोठी मागणी आहे. मात्र मागणीच्या तुलनेत कापसाची आवक कमी आहे. काही शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अंदाज घेत कापसाची साठवणूक करून आता हंगामाच्या शेवटी कापूस विक्रीस काढला आहे. अशा शेतकऱ्यांना जादा दर मिळताना दिसत आहे. कापसाला अद्यापही सर्वसाधारण दर दहाहजार रुपयांच्या टप्प्यात मिळत आहे.

ताजे कापूस बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/03/2022
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल7810081008100
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1092380001100010600
जामनेरहायब्रीडक्विंटल3280501020010000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल57395001110010500
उमरेडलोकलक्विंटल42695001220012100
मनवतलोकलक्विंटल190097001273012500
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल222288001345013250
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल11092001230012100
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल40090001195010500

Leave a Comment

error: Content is protected !!