कापसाला मिळतोय चांगला दर ; शेतकऱ्यांमध्ये मात्र कहीं खुशी..कहीं गम…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे दर, हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही तेजीत असल्याचे पहायला मिळत आहे. मागच्या महिन्यात कापसाने क्विंटलमागे तब्बल १३ हजार रुपयांवर उसळी मारली. शिवाय सध्या कापसाला १२ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून फरदड कापसाला देखील १० हजार रुपयांचा भाव मिळताना दिसतो आहे. कापसाला केवळ फेब्रुवारी महिना सोडला तर चांगले दर मिळताना दिसत आहे. शिवाय व्यापाऱ्यांकडून कापसाच्या मागणीमध्ये काही कमी नाही. मात्र या चढ्या भावाचा फायदा अशाच शेतकऱ्यांना मिळाला आहे ज्यांनी कापसाची साठवणूक केली आहे.

कापसाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कापसाचे दर १० हजार रुपयांचे झाल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रिला काढला. बिघडलेले हवामान आणि बोंडअळीचा हल्ला यामुळे उत्पदनात मोठी घट झाली. उरला सुराला हाती आलेला माल विकण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई केली. मात्र काही शेतकऱ्यांनी टायमिंग साधत कापसाची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला. सध्या कापसाचा भाव १० हजारांच्या वर गेला आहे. त्यामुळे साठवलेल्या कापसाला चांगली किंमत काही शेतकऱ्यांना मिळाली. मात्र ज्या शेतकऱ्यांनी कमी दरात कापूस विकला त्यांच्यामध्ये नाराजी दिसून येत आहे. ज्या व्यापाऱ्यांनी कमी दरात कापूस खरेदी केला त्या व्यापाऱ्यांना आता फायदा होताना दिसत आहे. वर्धा जिल्ह्यातील बाजारपेठेत तर 13 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला होता.

फरदड कापसामुळे शेतकऱ्यांना फायदा

–फरदड कापूस म्हणजे हंगाम संपूनही अधिकच्या उत्पादनासाठी कापसाला पाणी देऊन उत्पादन घेणे.
–मूबलक प्रमाणात पाणीसाठा होता. त्यामुळे कापूस मोडणीपेक्षा त्याची जोपासना केली तर आर्थिक लाभ शेतकऱ्यांना होत आहे.
— तीन ते चार वेचण्या पूर्ण झाल्यानंतरही कापूस शेतामध्ये ठेऊन पाणी देऊन कापसाचे उत्पादन घेतले.
–फरदड कापसाला बाजारपेठेत 10 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे.

कापसाचे ताजे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/04/2022
अमरावतीक्विंटल33090001220010600
04/04/2022
अमरावतीक्विंटल22590001220010600
आष्टी- कारंजाक्विंटल175115001170011600
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल3800080008000
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल205105001230011000
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल20085001130010900
जामनेरहायब्रीडक्विंटल4397001180011125
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल88990001150010000
उमरेडलोकलक्विंटल52395001243012325
मनवतलोकलक्विंटल190093001238512200
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल2917000120009500
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल131690001282511830
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल30080001220010500
03/04/2022
आष्टी- कारंजाक्विंटल150113001150011400
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल47995001140010500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल12580001200010000
भिवापूरलांब स्टेपलक्विंटल20590001203010500
02/04/2022
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल23395001130010500
वरोरालोकलक्विंटल30480001200011500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल427800120009900
किल्ले धारुरमध्यम स्टेपलक्विंटल105116011185611856
01/04/2022
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल325115001160011550
जामनेरहायब्रीडक्विंटल3490001150011000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल49095001130010500
उमरेडलोकलक्विंटल16990001220012100
मनवतलोकलक्विंटल140095001255012250
वरोरालोकलक्विंटल74678001200010000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1477800113509595
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल11780001200011000
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल5090001200011700
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल4008000125009500
किल्ले धारुरमध्यम स्टेपलक्विंटल58116081180611806
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल9708500127009900
31/03/2022
समुद्रपूरक्विंटल10098000122509700
घणसावंगीक्विंटल10089001030010100
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल2558200118009500
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल16090001110010600
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल2391001240012100
जामनेरहायब्रीडक्विंटल4380551070010300
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल39195001140010700
परभणीलोकलक्विंटल10096001180011500
उमरेडलोकलक्विंटल30590001224012150
मनवतलोकलक्विंटल190094001264012300
वरोरालोकलक्विंटल44778511220010000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल137750096008550
काटोललोकलक्विंटल1208000110009000
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल172890001282511930
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल22608000122009420
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल40095001250010500
किल्ले धारुरमध्यम स्टेपलक्विंटल114118081200612006
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल231118001201111850
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल9258500125259800
नरखेडनं. १क्विंटल70110001150011300

Leave a Comment

error: Content is protected !!