Cotton PA 837 : देशी कापसाचे नवे वाण केवळ 160 दिवसांत होते तयार; पहा वैशिष्टये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागच्या दोन दशकांपासून बहुतांश शेतकरी संकरित बीटी जातींची लागवड करीत आहेत. मात्र त्याची उत्पादकता कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा देशी वाणाकडे वळत आहेत. आज आपण कापसाच्या एका देशी वणाविषयी माहिती करून घेउया…

परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने देशी कापसाचे पीए ८३७ (Desi Cotton PA: 837) हे सरळ वाण विकसित केलं आहे. या नवीन वाणास भारतीय कृषी संशोधन परिषदेने(ICAR) मान्यता दिलीय. हे वाण रसशोषक किडी व दहीया रोगास सहनशील आहे. ते दक्षिण भारत विभागाकरिता प्रसारित करण्यात आलं आहे. हे वाण काही चाचण्यांनंतर लवकरच महाराष्ट्रात देखील प्रसारित केलं जाणार आहे.

देशी कापूस वाणाचे फायदे

–देशी वाणांवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होत नाही.
— गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
–देशी वाणांचा खर्च बीटीच्या तुलनेत कमी आहे.
–महत्त्वाचे म्हणजे देशी तसेच सरळ वाणं ही कमी कालावधीची आहेत.
–त्यामुळे कापसाचे नवीन देशी व सरळ वाण विकसित करण्यावर सरकारी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठांनी भर दिला आहे.
–कापसाच्या धाग्याची लांबी, मजबुती, तलमता तसेच पिकाची उत्पादकता यामध्ये देशी वाण सरस कसे ठरतील यावर संशोधन केले जात आहे.

परभणी येथील कापूस संशोधन केंद्र हे कापसाच्या देशी वाणावर संशोधन करणारे देशातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राने यापुर्वी पीए – ७४०, ८१२, ८१०, ५२८, ०८, २५५, ४०२ आणि ७८५ हे देशी वाण विकसित केले आहेत. या नव्या देशी वाणांची उत्पादकता आणि कापसाची प्रत बीटीच्या तुलनेत कुठेच कमी नाही. उलट काही वाण तर बीटीपेक्षा सरस आहेत.

महाराष्ट्रात एकूण कापूस लागवडीपैकी ९८ टक्के क्षेत्र बीटी वाणांनी व्यापलेलं आहे. त्यामुळे देशी कपसाच्या वाणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. म्हणून परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने दक्षिण भारत विभागाकरिता देशी कापसाचे पीए ८३७ हे सरळ वाण विकसित केलं आहे.

पीए ८३७ या सरळ वाणाची वौशिष्ट्येः

  • या वाणाचे उत्पादन हेक्‍टरी १५ ते १६ क्विंटल मिळते.
  • धाग्याची लांबी २८ मिली मिटर तर तलमपणा ४.८ आहे.
  • हा वाण रसशोषक किडी, कडा करपा आणि दहीया रोगास सहनशील आहे.
  • परिपक्व होण्याचा कालावधी १५० ते १६० दिवसाचा आहे.
  • आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात या वाणाचे उत्पादन चांगले मिळाले आहे. लवकरच हे वाण काही चाचण्यांनंतर महाराष्ट्रात देखील प्रसारित केले जाणार आहे.
  • देशी कापसाचे बी पुढे चार वर्ष बियाणे म्हणून वापरता येते.
  • कोरडवाहू पद्धतीने कमी पाण्यात उत्पादन घेता येते.

Leave a Comment

error: Content is protected !!