कापसाच्या दरात तेजी कायम , दर 10 हजार 300 च्या वर ; पहा आजचे कापूस बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार मनवत इथं कापसाला सर्वाधिक 10205 रुपये इतका कमाल भाव मिळाला. आज मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार 500 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. याकरिता किमान भाव 8300, कमाल भाव 10205 तर सर्वसाधारण भाव दहा हजार 130 रुपये इतका मिळाला आहे. तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वाधिक आवक ही मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती इथेच झाली आहे.

दरम्यान बुधवारचे म्हणजेच 9 तारखेचा बाजार भाव बघता सर्वाधिक कापसाला भाव हा दहा हजार 380 रुपये इतका मिळाला आहे हा भाव भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं मिळाला आहे. तर नऊ तारखेला कापसाची सर्वाधिक आवक ही हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली ही आवक पाच हजार पाचशे क्विंटल इतकी झाली आहे. मागील काही दिवसांपासून कापसाचे कमाल भाव आहे दहा हजार 200 रुपयांपर्यंत होते. मात्र आता हे भाव वाढताना दिसून येत आहेत, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात हे कापसाच्या दरामध्ये तेजी दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर हे कापसाचे दर वाढलेले असलेले पाहायला मिळतात. दोन्ही बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात तेजी असल्याचे दिसून येते आहे. कापसाच्या मागणीला वाढ आहे मात्र त्या तुलनेने पुरवठा कमी आहे आणि हेच समिकरण 2022 मध्ये देखील सुरू आहे . याचाच लाभ कापूस बाजाराला होतोय. तसेच उन्हाळ्यात कॉटनच्या कपड्यांना मागणी वाढते. त्यामुळे कापड उद्योगांनी कापूस खरेदी सुरू केली आहे त्यामुळे बाजारात कापसाचे दर टिकून आहेत. देशात सध्या कापसाचे दर नऊ हजार पाचशे ते दहा हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल साठी मिळत आहेत.

2022 मध्ये ही तेजी राहण्याची शक्यता
भारत आणि अमेरिकेत कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने पुरवठा कमी राहील. त्यामुळे कापूस बाजार 2022 मध्ये ही तेजीत राहण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात कापसाचे दर जवळपास 41 टक्क्यांनी वाढले आहेत. 2022 मध्ये जागतिक कापूस उत्पादन वाढीचा अंदाज असला तरी वापरही वाढला तसेच चीनची आयात वाढेल त्यामुळे कापूस बाजारात तेजीचा माहोल राहील असं अमेरिकेतील एका संस्थेने म्हटले आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 10-2-22 कापूस बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/02/2022
अमरावतीक्विंटल1759600101009850
हिंगोलीक्विंटल55967598259750
किनवटक्विंटल115960098009700
घणसावंगीक्विंटल150880099009700
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल5029800100009900
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल270950099509900
जामनेरहायब्रीडक्विंटल27787594379372
मनवतलोकलक्विंटल250083001020510130
देउळगाव राजालोकलक्विंटल15009500100809700
09/02/2022
अमरावतीक्विंटल1459500101009800
हिंगोलीक्विंटल48965098009725
सावनेरक्विंटल39009800100009900
समुद्रपूरक्विंटल13608100102009600
घणसावंगीक्विंटल200890098009500
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल9458491102829867
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल7219800101009900
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल6899500101509700
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल550880099809800
जामनेरहायब्रीडक्विंटल34785594259360
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल15889500100009700
उमरेडलोकलक्विंटल77180001030010200
मनवतलोकलक्विंटल350083001022510110
देउळगाव राजालोकलक्विंटल2500950099809700
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल5778000101509075
काटोललोकलक्विंटल280800098009000
कोर्पनालोकलक्विंटल1851770099008000
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल2108500100009600
भिवापूरलांब स्टेपलक्विंटल4019200103809790
सिंदीलांब स्टेपलक्विंटल708200101009650
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल98086401005010035
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल55008000103409180
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल7008500102509950
वरोरा-शेगावमध्यम स्टेपलक्विंटल469500100509700
यावलमध्यम स्टेपलक्विंटल5789086908350
किल्ले धारुरमध्यम स्टेपलक्विंटल267970098009702

Leave a Comment

error: Content is protected !!