कापसाच्या भावात तेजी कायम ; पहा राज्यातील बाजारसमित्यामध्ये किती मिळतोय भाव?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हंगामामध्ये सर्वात चांगला दर मिळालेले पीक म्हणजे कापसाचे पीक होय. कापसाच्या पिकाला मागील अनेक वर्षांचे रेकॉर्डब्रेक करत या वर्षी तब्बल 13 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळवला. त्यामुळे सहाजिकच कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आतादेखील सध्याचे बाजार भाव बघता कापसाच्या दरातील तेजी कायम आहे.

आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल 12 हजार रुपयांचा कमाल भाव कापसाला प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. दिनांक वीस एप्रिल चे भाव पाहिले असता सिंधी (सेलू) कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लांब स्टेपल कापसाला तब्बल बारा हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल साठी भाव मिळाला आहे. तर राज्यातल्या विविध बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला सर्वसाधारण भाव हा दहा हजार ते अकरा हजार रुपयांपर्यंत मिळतो आहे.

आयात शुल्क हटवल्याची धाकधूक

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क हटवल्यामुळे कापसाच्या दरावर परिणाम होईल की काय ? अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात होती. तर दुसरीकडे या निर्णयाचे स्वागत अवघ्या टेक्सटाइल इंडस्ट्री मधून केले जात आहे. त्यामुळे सुती कपडे स्वस्त होण्याची देखील चिन्हे आहेत. मात्र शेतकऱ्याचं काय? असा प्रश्न राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या मनात आहे. मात्र सध्याचे दर पाहता कापसाचे दर हे कमाल 12 हजार 500 रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे अद्याप तरी या निर्णयाचा कोणताही परिणाम कापसाच्या दरावर झालेला दिसून येत नाहीये.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

कापूस बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/04/2022
अमरावतीक्विंटल19590001200010500
20/04/2022
अमरावतीक्विंटल20590001200010500
समुद्रपूरक्विंटल3408000122009850
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल41595001220011000
जामनेरहायब्रीडक्विंटल1895001150011200
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल74195001180010500
उमरेडलोकलक्विंटल62395001215012050
वरोरालोकलक्विंटल18775001200011000
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल172095001257011690
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल30008500123109670
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल30082001230010500
19/04/2022
अमरावतीक्विंटल23590001200010500
समुद्रपूरक्विंटल6158500125009800
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल348100001260011000
जामनेरहायब्रीडक्विंटल34101001200011590
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल475105001200011200
उमरेडलोकलक्विंटल42197001230012200
वरोरालोकलक्विंटल9880001220011000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल22282001220010200
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल192094001268011680
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल20091001240011900
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल43298500124309280
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल25084001230010200
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल15408700124809800

Leave a Comment

error: Content is protected !!