आनंदवार्ता…! कापसाचे भाव पुन्हा वधारले ; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हंगामाच्या सुरवातीला कापसाला 10 हजारांचा दर मिळाला होता. त्यानंतर मात्र कापसाच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. आंतराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणीच नसल्यामुळे दर घसरल्याचे बोलले जात होते. तसेच मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव देखील झाला होता. आताचे चित्र पाहता नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी दर मिळाला आहे.

मागील सात दिवसांपासून कापसाला 7 हजार प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मात्र आता हा भाव थेट 9 हजारावर गेला आहे. आज राळेगाव बाजारसमितीत देखील 9025 रुएये प्रति क्विंटल इतका जास्तीत जास्त भाव मिळाला आहे. उर्वरित बाजार समितींमध्ये देखील 8 हजार प्रतिक्विंटलच्या आसपास भाव गेलेले पाहायला मिळत आहेत . कापसाची मागणी वाढल्याने कापसाच्या दरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

राज्यातला आजचा(28/12/2021) कापूस बाजारभाव

शेतमाल— जात/प्रत— परिमाण— आवक— कमीत कमी दर— जास्तीत जास्त दर— सर्वसाधारण दर

1)हिंगोली — क्विंटल 100 8010, 8220, 8115
2)राळेगाव — क्विंटल 6500 8200, 9025, 8850
3)गोंडपिंपरी ए.एच ६८ – लांब स्टेपल क्विंटल 1416 8050, 8200, 8100
4)पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 142 5650, 8750, 8725
5)जामनेर हायब्रीड क्विंटल 24 6542, 8019, 7430
6)सिंदी लांब स्टेपल क्विंटल 77 8580, 8700, 8650
7)परभणी मध्यम स्टेपल क्विंटल 350 8600, 8800, 8780

Leave a Comment

error: Content is protected !!