पीकविमाप्रश्नी शेतकऱ्यांचे ‘चूल बंद’ आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या पूर्व भागात दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक विमा व इतर नुकसानीची भरपाई न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी तारीख 1 इथं चूल बंद आंदोलनाला सुरुवात केली.

रुईसह परिसरातून दोनशेवर शेतकरी पिक विमात सहभागी झाले होते. शासनाने दखल न घेतल्याने आता पिक विमा कंपनी भरपाई देईल त्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाईल असा निर्धार शेतकर्‍यांनी बोलून दाखवला. शेतकऱ्यांनी पीक विमा नुकसान भरपाईसाठी कृषी महसूल विभाग आणि विमा कंपनीकडे वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र शेतकऱ्यांना याबाबत कुठल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही विमा कंपनीने कृषी आणि महसूल विभागाचे कोणत्या प्रकारचे म्हणणे ऐकले नाही. म्हणूनच शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कृषी अधिकारी व कृषी विभाग तसेच खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनाही भेटून आपली व्यथा मांडली मात्र दखल न घेतली गेल्याने शेतकऱ्यांनी आता चूल बंद आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी चूल बंद आंदोलनाचा निर्णय घेऊ नये आम्ही कंपनीशी बोलून लवकरच तोडगा काढून न्याय मिळवून देऊ असं आश्वासन निफाड तालुका कृषी अधिकारी बी. जे. पाटील व मंडळ अधिकारी चंद्रभान पंडित यांनी केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!