लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावादरम्यान तोबा गर्दी 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हॅलो कृषी ऑनलाईन : आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येथील बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपाससून टोमॅटोचे देखील लिलाव पार पाडले जात आहेत. या बाजार समितीत आज सायंकाळी टोमॅटो लिलावाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी  इथं तोबा गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

किती मिळाला बाजारभाव

आज प. पू.  भगरीबाबा धान्य आणि भाजीपाला आवारात संध्याकाळी पाच वाजता टोमॅटो लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी शेतकऱ्यांनी सतराशे 90 गक्रेट टोमॅटो लिलावासाठी आणला होता.  टोमॅटो लिलावाच्या शुभप्रसंगी 20 किलोच्या टोमॅटो क्रेट्सला कमाल 601 आणि किमान 151 तर सर्वसाधारण 431 रुपये इतका बाजार भाव मिळाला. पण यावेळी व्यापारी बाजार समिती कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचा पाहायला मिळाले  आणि अशातच टोमॅटोचं लिलाव सुरू करण्यात आले.

कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता काहीसा कमी झाला आहे . मात्र केरळमध्ये तिसरी लाट आल्याचे बोलले जात आहे.  अशातच ग्रामीण भागात कोरोना  चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव सह कांद्याच्या प्रमुख 15 बाजार समिती तसेच धान्य व भाजीपाला मार्केट  नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांचा रोशन झेलत दहा ते बारा दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र आता टोमॅटोच्या  लिलावादरम्यान मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

Leave a Comment

error: Content is protected !!