शेतकरी मित्रांनो तुम्हीही भात शेती करता का ? मिळू शकते दुप्पट कमाई, जाणून घ्या ‘फिश राईस फार्मिंग’बाबत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक शेती सोडून आता शेतकरी नवनवीन प्रयोग शेतामध्ये करीत आहे. अशीच एक अनोखी संकल्पनेबद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहोत. याला तंत्रज्ञान म्हणून किंवा एक संकल्पना. ही संकल्पना म्हणजे फिश राईस फार्मिंग. नेमके काय आहे ही संकल्पना? फिश राईस फार्मिंग कशी केली जाते? याबद्दल या लेखात जाणून घेऊ.

फिश राईस फार्मिंग

या संकल्पनेच्या माध्यमातून जे शेतकरी भात पीक घेतात अशा शेतकऱ्यांना दुप्पट कमाई करण्याची संधी मिळू शकते. या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांना भाताची लागवड ही एक विशिष्ट पद्धतीने करावी लागते.या विशिष्ट प्रकारच्या शेतीला फिश राईस फार्मिंग असे म्हणतात. विशेष म्हणजे या प्रकारच्या शेतीत ज्या ठिकाणी भात लागवड केलेली आहे अशा ठिकाणीच मासे पालन नही करता येते. त्यामुळे भात पिकाच्या फायदा बरोबरच शेतकऱ्यांना मासे विक्रीतूनही आर्थिक नफा होऊ शकतो.

या भागात केले जाते फिश राईस फार्मिंग

सध्या जागतिक स्थितीचा विचार केला तर इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मलेशिया, बांगलादेश, चीन इत्यादी देशांमध्ये फिश राईस फार्मिंग केली जाते. भारताच्या काही भागांमध्ये सुद्धा अशा प्रकारची शेती केली जात असून तिच्या सहाय्याने शेतकरी चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न कमावत आहेत. ही शेती करताना भात पिकामध्ये साठलेल्या पाण्यातही मासे पालन केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होतो म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांना धान विक्रीतून आणि मासे विक्रीतून दुप्पट उत्पन्न मिळते. यामध्ये शेतकरी भात लागवड करण्याअगोदर फिश कल्चर तयार करू शकता.

भात पिकालाही फायदा

–या प्रकारच्या मत्स्यशेतीतून चांगल्या पद्धतीचा आर्थिक फायदा होऊ शकतो.
–भात लागवडीची पद्धत, माशांचे उत्पादन व त्यावरील योग्य व्यवस्थापन वर देखील अवलंबून असते.
–विशेष म्हणजे या मत्स्य शेतीमुळे भात पिकावर कुठलाही परिणाम होत नाही.
–एकाच शेतात एकत्रितपणे मत्स्यपालन केल्याने भात रोपांची रोगांपासून मुक्तता होते.

फिश राईस फार्मिंग साठी कोणत्या प्रकारचे जमीन आवश्यक आहे?

या प्रकारच्या शेती साठी कमीत कमी उतार असलेली जमीन अत्यंत फायदेशीर असते. कारण अशा प्रकारच्या जमिनीत पाणी सहजतेने जमा होते. तसेच शेताची तयारी करण्यासाठी सेंद्रिय खतावर अवलंबून राहावे. यामध्ये जर विचार केला तर मध्यम होत असलेली गाळाची जमीन उत्तम मानली जाते.

Leave a Comment

error: Content is protected !!