फसवणुकीला बसणार आळा ; ग्राहकांना चाखायला मिळणार अस्सल हापूस आंब्याची चव , कृषी पणन मंडळाचा उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याची चाहूल लागली की ग्राहकांना आस लागते आंब्यांची… त्यातही अस्सल हापूस आंब्यांची चव चाखण्यासाठी ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र मार्केटमध्ये रत्नागिरी , देवगड हापूसच्या नावाने ग्राहकांची मोठी फसवणुक झाल्याचे पहायला मिळते. मात्र आता असे होणार नाही. कारण कृषी पणन मंडळाकडून थेट उत्पादक ते ग्राहक अशी साखळी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या उपक्रमाद्वारे संपूर्ण राज्यभरात (G.I) भौगोलिक मानांकन मिळालेल्या हापूसचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.7 मार्चपासून नोंदणी करण्यात येणार असल्याचे पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी सांगितले आहे.

काय आहेत या उपक्रमाची वैशिष्ट्ये
–उत्पादक ते ग्राहक अशी थेट यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न
— मुंबई आणि पुण्यासह इतर महत्वाच्या बाजारपेठेत शासकीय स्टॉलच्या माध्यमातून आंबा विक्रीसाठी उपलब्ध
–उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावरच आंब्याचा दर्जा हा तपासला जाणार आहे.याकरिता स्कॅनिंग केले जाणार आहे.
–हे तपासणी झाल्यानंतर एकाच ब्रॅंण्डखाली हे आंबे विकले जाणार आहेत.
–अधिकच्या दराचा फायदा थेट शेतकऱ्यांना आणि संबंधित कंपनीला देखील होणार आहे.
–या पध्दतीमुळे मानांकनाच्या नावाखाली होणाऱ्या विक्रीला बसणार आळा

स्टॉल धारकांसाठी महत्वाच्या बाबी

–आंबा बागायतदारांना स्टॉल उभारणी करायचा आहे त्यांनी रत्नागिरी येथील कृषी पणन मंडळाचे विभागीय कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
–स्टॉल नोंदणीकरिता आंबा कलमांच्या नोंदी असलेला सातबारा उतारा
–आधार कार्ड, स्टॉलवर विक्री करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड
–कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र
— भौगोलिक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र या बाबी आवश्यक आहेत.
— अनामत रक्कम म्हणून पणन मंडळाच्या नावाने 10 हजार रुपयांचा धनादेश अदा करावा लागणार आहे. शिवाय ही रक्कम अदा केलेली पावती अर्जासोबत जोडावी लागणार आहे.
— तरच स्टॉल उभारणीचा परवाना मिळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!