अवकाळीचा फटका…! अलिबागच्या पांढऱ्या कांद्यासाठी ग्राहकांना पाहावी लागणार वाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नोव्हेम्बर डिसेम्बर मध्ये झालेल्या अवकाळीचा फटका केवळ फळबागा तसेच मुख्य पिकांना बसला नाही तर याचा फटका हा नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कांदा पिकालाही झाला आहे. पांढऱ्या कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अलिबागच्या कांद्यालाही याचा फटका बसला आहे . अवकाळी मुळे पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कवेत डोळ्यातून पाणी येणे बाकी आहे . अलिबाग तालुक्यात पाणी साचणाऱ्या जागेवर लागवड करण्यात आलेल्या कांद्याची आता पुन्हा लागवड करावी लागणार आहे . त्यामुळे पांढरा कांदा मार्केटला मिळण्यासाठी ग्राहकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे .

नव्याने लागवड कराताना ही काळजी घ्यावी
–आता नव्याने लागवड करण्यात येणारा कांदा ही गादीवाफ्यावरच केलेली फायद्याचे राहणार आहे.
–एवढेच नाही तर वाफ्यात पाणी साचून राहू नये म्हणून चरद्वारे पाणी काढून देणे महत्वाचे राहणार आहे.
— रोपाची लागवड करताना सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत हे प्रति चौरस मीटरला 1 किलो ट्रायकोडर्मा पावडर, 10 ग्रॅम निंबोळी पावडर प्रति चौरस मिटरला 50 ग्रॅम याप्रमाणे मातीत मिसळून गादी वाफे तयार करणे गरजेचे आहे.
–वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या रोपावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.
— त्यामुळे रोपे ही जागेवरच जळत असतील तर सिलीकॅान अधिक स्टीकर किंवा सुक्ष्म अन्नघटक म्हणून चिलेटेड झिंक 2 ग्रॅम किंवा 2 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
–कांदा रोपाची मर होत असेल तर मात्र, मेटालेक्सिल 8 टक्के अधिक मन्कोजेब 64 टक्के हे पाण्यात मिसळून रोपाच्या बुडाला सोडावे.
–रोप लागवडीनंतर 10 दिवसांनी झॅाक्सिस्ट्रोबीन 11 टक्के अधिक टेब्युकोनझोल 18.3 टक्के, 10 मिली अधिक क्विनॅाल फॅास 15 मिली किंवा क्लोरोपायरीफॅास 15 मिली याप्रमाणे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
–लागवडीनंतर 15 दिवसांनी पुन्हा याचप्रमाणे फवारणी करणे गरजेचे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!