पावसामुळे कांदा पिकाचेही नुकसान ; जाणून घ्या कसे कराल व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : झटपट आणि चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे पाहत असतो. पण यंदा सोयाबीन कापूस तूर अशा पिकासोबत कांदा या पिकाचे देखील पावसामुळे नुकसान झाले आहे. पावसानंतर आर्द्रता वाढल्याने कांद्याची वाढ तर खुंटलेलीच आहे शिवाय कांद्याच्या मुळावर याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत

पावसानंतर कांद्यावर परिणाम

–पावसानंतर आता शेतात भरपूर आर्द्रता निर्माण झाली आहे जे कांदा पिकासाठी धोकादायक आहे.
–कांद्याचे मुळ सडने,
–मुळाला पांढऱ्या आळीचा घेराव आणि वाढती आर्द्रता यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा चिंतेत आहे.
–या तीन रोगांचा प्रादुर्भाव सर्रास कांद्यावर पाहवयास मिळत आहे.
–या किडीचा कांद्यावर प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

कसे कराल नियोजन

किडीपासून कांदा पिकाचा बचाव करण्यासाठी कार्बेंडाझीम 75% डब्ल्यूपी + मंकोझेब 63% डब्ल्यूपी 2 ग्रॅम औषधे प्रति एक लिटर पाण्यात मिसळून फवारणे गरजेचे आहे. तर कॉपर ऑक्सी क्लोराइड 50% डब्ल्यूपी 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे. किडीचा प्रादुर्भाव नसला तरी कांदा वाढीसाठीही शेतकऱ्यांनी औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे.पांढऱ्या आळीचा बंदोमस्त करण्यासाठी क्लोरोपायरिफॉस 50% ईसी + सायपरमेथ्रिन 5% ईसी 500 ग्रॅम प्रति एक्कर ते पावडर मध्ये मिसळून फवारल्यात किडीचा प्रादुर्भाव टळला जातो तर कांद्याची वाढ होते.

असे करा कांदा आणि रोपाचे व्यवस्थापन

वातावरणातील बदल आणि मध्यंतरीच्या पावसामुळे कांद्यावर किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्यामध्ये 65 टक्के सल्फर आणि 10 टक्के केनिकॅानॅझोन हे एकत्र असलेले औषध बाजारपेठेत उपनब्ध आहे. ते एकरी 30 ग्रॅम फवाराचे आहे. त्याच्या सोबत झिप्रोनील 30 मिली, लॅबडासायरोथ्रीन हे 8 मिली 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून शेतकऱ्यांना फवाराणी तात्का करावी लागणार आहे. यामुळे कांदा आणि कांद्याचे रोपही जोमात येणार आहे. दिवसागणिक वातावरणात बदल होत असल्याने शेतकऱ्यांनी वेळेत फवारणी करणे गरजचे झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!