उन्हाळ्यात जनावरांना ‘नाकाडी’ चा धोका ; जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी , पशुपालकांनो आपल्या दुभत्या जनावरांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे असते आजच्या लेखात आपण जनावरांमध्ये होणाऱ्या ‘नाकाडी’ या आजाराविषयी माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात बरेचदा जनावरांना चरायला सोडल्यानंतर नजरेस पडणाऱ्या कोणत्याही डबक्यातील पाणी ते पीत असतात. अशा डबक्यात गोगलगायींचा प्रादुर्भाव झालेला असल्यास जनावरांना ‘नाकाडी’ नावाचा आजार होतो.

नाकाडी आजाराविषयी …
नाकाडी हा आजार गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यांसारख्या सर्वच जनावरांमध्ये आढळून येतो. नाकाडी आजार सिस्टोसोमा नावाच्या पर्णकृमी परजीवीमुळे होतो. परजीवी हे जनावरांच्या शरीरावर बसून रक्ताचे शोषण करीत असतात. मात्र हा परजीवी जनावरांच्या नाकातील मेझेट्रिक नावाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आढळून येतो. या आजाराची बाधा प्रामुख्याने जनावरे पीत असलेल्या पाण्याच्या स्त्रोतात गोगलगायींचा प्रादुर्भाव असल्यास होते.

नाकाडीची लक्षणे

–या आजारात जनावरांना श्वास घेण्यास घेण्यास त्रास होतो.
–जनावरे श्वास घेताना घर-घर असा आवाज येतो.
— यात प्रामुख्याने नाकातून येणारा घुरघुरणारा आवाज हे मुख्य लक्षण आहे.
–नाकातून सतत शेंबूड गळतो आणि चिकट स्त्राव बाहेर येत असतो.
— जनावरांच्या नाकाच्या आतील भागाचे निरीक्षण केल्यास फुलकोबीच्या आकारासारखी वाढ झालेली दिसून येते.

नकाडीवरील उपचार
–या आजाराचे निदान करण्यासाठी फुलकोबीच्या आकाराचा नाकाच्या आतील भाग चिमट्याच्या सहाय्याने रगडून घ्यावा.
–रगडल्यानंतर बाहेर येणारा चिकट स्त्राव काचपट्टीवर घेऊन ४ % ग्लिसिरीन टाकून, सुक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करावे.
–निरीक्षण केल्यानंतर त्यात सिस्टोसोमाची अंडी दिसून येतात.
–या रोगावर अॅथीओमॅलीन थायोमेलेट नावाचे ओषध पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तीन वेळा टोचून घ्यावे.
–लक्षणे गंभीर असल्यास पुढील उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावेत.

यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आजूबाजूच्या परिसरातील विशेषतः जनावरांचे पाणवठे असलेल्या जागी गोगलगायी असल्यास त्यांचा नायनाट करावा. आजारी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. पाण्याचा हौदाला महिन्यातून दोन वेळा किंवा आठवड्यातून एकदा चुना मारून घ्यावा.

Leave a Comment

error: Content is protected !!