दिवसा उन्हाचा चटका , पहाटे थंडी ; काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील किमान तापमानात घट होत असतानाच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान होत आहे.  आज दिनांक 9 रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे.  उर्वरित राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राजस्थानात थंडीच्या लाटेचा इशारा

जवाद  चक्रीवादळ निवळल्यानंतर पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ वाहणारे चक्राकार वारे महाराष्ट्रा लगतच्या अरबी समुद्रात असलेले चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवडली आहे.  तर वायव्य भारतात थंडी वाढू लागली असून राजस्थानात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.  बुधवारी दिनांक आठ रोजी चूरु इथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात निचांकी 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान राज्यात उन्हाचा चटका वाढला असतानाच अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान होत आहे.  त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे.  बुधवारी दिनांक आठ रोजी पुणे येथे नीचांकी 14.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी 33 . २ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!