विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळी आधीआवेशन सुरु असताना विधानभवनाच्या आवारात पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष भानुदास देशमुख (५६) यांचा जे.जे. रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील होते.

देशमुख यांना गंभीर जखमी अवस्थेत जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर निवेदन करत असतानाच ही घटना घडली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित शेतकऱ्याने आयनॉक्सजवळ आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते. तसेच तो १५ टक्के भाजला असल्याची माहिती सभागृहात दिली होती.

मात्र, देशमुख यांनी आधीच रॉकेल ओतून घेतले होते. विधानभवनाच्या आवारात आल्यानंतर त्यांनी पेटवून घेतले. आग विझवल्यानंतर ते तळमळत पडले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. ते ४५ टक्के भाजल्याने अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

 

Leave a Comment

error: Content is protected !!