तब्बल 71 लाखांची बोली लागलेल्या सोलापूरच्या सर्जा मेंढ्याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यातील चांडोलेवाडीत राहणाऱ्या पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या बाबुराव आंबेडकर यांचा माडग्याळ जातीचा अत्यंत डौलदार मेंढा सर्जा याचा मृत्यू झाला आहे. या सर्जाकरिता तब्बल 71 लाखांची बोली लागली होती. त्याच्या जाण्यानं मेटकरी कुटुंबांने आपल्या कुटुंबातील एक सदस्य गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. निमोनियाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारादरम्यान सर्जा मेंढ्याचा मृत्यू झाला. तो अडीच वर्षांचा नर मेंढा होता.

सर्जा मेंढ्याला तीन चार दिवसांपूर्वी निमोनिया चा संसर्ग झाला होता. आजार बळावल्याने त्याच्यावर पशुवैद्यकीय डॉक्‍टरांकडून उपचार सुरु होते त्याचा जीव वाचवण्यासाठी मेटकरी यांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र गुरुवारी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अजस्त्र देहयष्टी, देखणं रूप असलेल्या सर्जाचे नाक पोपटाप्रमाणे होते. हेच त्याचं सौंदर्य स्थळ मानलं जात होतं. सर्जा मेंढा मेटकरी कुटुंबाला वर्षाकाठी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देत होता. मेटकरी कुटुंब हे घरातील एका सदस्याप्रमाणे या सर्जाचे पालन पोषण करत होते.

माडग्याळ जातीचा अत्यंत डौलदार सर्जा अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवायचा आटपाडीच्या जत्रेतील त्याला 71 लाख रुपयांची बोली लागली होती सर्जा मेंढा माणदेशी शान आणि भूषण म्हणून ओळखला जात होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकात हिंद केसरी म्हणून तो नावाजला गेला होता.

Leave a Comment

error: Content is protected !!