पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पार्किंगसाठी एकरकमी पैसे भरण्याचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासू पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहनांच्या पार्कींगचा मुद्दा गाजत होता. अखेर यावर तोडगा निघाला असून प्रशासन आणि संघटनांमधली चर्चा महत्वाची ठरली आहे. तर आता वाहनांच्या पार्कींगसाठी एकरकमी पैसे भरण्याचा निर्णय झाला आहे. बाजार समितीच्या पार्कींगवरुन बाजार समिती प्रशासन आणि संघटना यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद होते. बाजार समितीमध्ये दाखल होणाऱ्या वाहनांना दिवसाला पार्कींगसाठी पैसे मोजावे लागणार होते.यासंदर्भात बाजार समितीने निविदाही काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, याला बाजार समितीमधील संघटनांनी तीव्र विरोध केला. एवढेच नाही तर प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात रविवारी बाजार बंद ठेवण्याचाही निर्णय घेतला होता.मात्र, आज बुधवारी प्रशासन आणि संघटनांमध्ये झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून रविवारच्या बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

नेमके काय झाले बैठकीत

–बाजार समितीमध्ये दाखल होणाऱ्या वाहनाला पार्कींग शुल्क म्हणून काही रक्कम अदा करावी लागत होती.
–याकरिता निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, पार्कींग सुविधा हा एक अतिरीक्त खर्च होतो.
–या सुविधेची आवश्यकता नसल्याची भूमिका काही संघटनांनी मांडली होती.
–त्यानुसार ही निविदा ह्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर आता एका वाहनाला किती रक्कम हे ठरवून एकरकमी पैसे घेतले जाणार असल्याचा निर्णय झाला आहे.
–हे शुल्क देखील नाममात्र असणार आहे. तर बाजार समिती प्रशासकाच्या निर्णयाला विरोध करीत संघटनांनी रविवारी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तो देखील आता मागे घेण्यात आला आहे.

वाहतूक कोंडीचा होता त्रास

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संबंध जिल्ह्यातून आणि लगतच्या भागातून वाहनांच्या रांगा लागत होत्या. त्यामुळे या वाहनधारकांकडून दिवसाला पार्कींग शुल्क आकारण्याचा निर्णय बाजार समितीच्या प्रशासनाने घेतला होता. मात्र, संघटनांनी याला विरोध दर्शवत प्रशासनाबरोबर चर्चा सुरु केली होती. याला अखेर बुधवारी झालेल्या बैठकीत यश मिळाले आहे. त्यामुळे पार्कींगच्या अनुशंगाने ज्या निविदा काढण्यात येणार होत्या त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. एका वाहनाला किती दर आकारायचा हे देखील ठरवले जाणार असल्याचे प्रशासक मधुकांत गरड यांनी सांगितले आहे.

उद्या (गुरुवारी) सकाळच्या बैठकीत ठरणार पार्कींग शुल्क

बुधवारी प्रशासक आणि संघटनांमध्ये केवळ बैठक पार पडली असून पार्कींगबाबतच्या निविदा ह्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर आता एकरकमी पैसे भरले जाणार आहेत. मात्र, एकरकमी पण एका वाहनाला किती हे उद्या टेम्पो चालक संघटना यांच्यात होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या बैठकीत एका वाहनाला किती पार्कींग हे ठरवताना अजून काही मतभेद होतात का हे पहावे लागणार आहे.

संदर्भ : टीव्ही ९

Leave a Comment

error: Content is protected !!