सोयाबीन आवकेत घट, व्यापारी आणि पोल्ट्रीधारकांनाही करावी लागेल चिंता; जणून घ्या दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनंतर राज्यातल्या विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनला अजूनही चांगला भाव मिळेल याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सोयाबीनच्या आवकेमध्ये मात्र दिवसेंदिवस घट होताना दिसून येत आहे. सोयाबीनची महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखलया जाणाऱ्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी केवळ ९ हजार पोत्यांची आवक झाली. तर सोयाबीनला 6 हजार 150 इतका दर मिळाला.

… तर व्यापारी आणि पोल्ट्रीधारकांनाही चिंता 

पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने सोयाबीनचे दर ४००० वर स्थिर राहावेत अशी मागणी केली होती. मात्र आता त्यांनाही काळजी घ्यावी लागणार आहे. कारण सोयाबीनचा पुरवठाच कमी होत आहे. सोयाबीन शेतकऱ्यांकडे असताना देखील ते विक्रीसाठी आणले जात नाही. परिणामी बाजार समितीत आवक कमी दिसत आहे. तर दरामध्ये तेजी दिसत आहे. दरम्यान आयात केलेले सोयापेंड आणि सोयाबीन यांच्या दरात फार मोठी तफावत नसल्याने प्रक्रिया उद्योजक हे स्थानिक पातळीवरील सोयाबीनलाच अधिकची पसंती देत आहेत. त्यामुळे एकतर सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे अन्यथा दर हे स्थिर राहत आहेत. दरवर्षी दिवाळी झाली की सोयाबीनची आवक ही 50 ते 60 हजार क्विंटलची असते यंदा उत्पादनात घट झाली असली तरी पदरी पडलेले सोयाबीन साठवणूक करण्यावरच शेतकरी भर देत आहेत. भविष्यात सोयाबीनच्या दराच अणखीन वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

तीन दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिरच

दिवाळीनंतर दरामध्ये सातत्याने वाढ होत होती. अखेर गेल्या तीन दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 6 हजार 200 रुपयांवर स्थिरावलेले आहेत. शिवाय ढगाळ वातावरण असल्यानेही आवक कमी होत आहे. सध्या सोयाबीनचे दर हे स्थिरावलेले असले तरी भविष्यात सोयाबीन हे वाढणारच. त्याशिवाय प्रक्रिया उद्योजक आणि होणारी मागणी याचा फायदा शेतकऱऱ्यांना होणार आहे. त्यामुळे अजून काही दिवस शेतकऱ्यांनी प्रतिक्षा केली तर वाढीव दर मिळणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

जाणून घ्या राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव ( हे भाव प्रति क्विंटलचे असून दुपारी ३ वाजेपर्यंतरचे आहेत. किमान -कमल – सर्वसाधारण असे आहेत. )

धुळे – 5810 – 5810- 5810

नागपूर – 4500- 6066 – 5675

लातूर – 6100 – 6850- 6500

अकोला -5200- 6200- 5750

भोकर -4700- 6250- 5482,

जिंतूर- 5701-6551-6200

परतूर- 6150- 6450

गंगाखेड 6250- 6400 -6३00

देऊळगाव राजा- 4500- 6300- 5800

धरणगाव -5757- 6400-5907,

आंबेजोगाई – 6050- 6400- 6200

चाकूर – 5961-6401- 6350

 

Leave a Comment

error: Content is protected !!