सोयाबीनच्या दराला उतरती कळा; पहा आजचा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिनाभरापासून सोयाबीनच्या दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. सोयाबीनला स्थिर भाव मिळालेला नाही केवळ एखाद्या दुसऱ्या बाजरपेठेत सोयाबीनला ७ हजारांचा कमाल भाव मिळतो आहे. काही बाजरसमित्यांमध्ये तर सोयाबीनचे भाव ५००-६०० रुपयांनी उतरले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. साठवलेल्या सोयाबीनचे करायचे काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. शिवाय उन्हाळी सोयाबीन देखील बाजरात दाखल होत आहे.

आजचे सोयाबीन भाजारभाव
आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता सोयाबीनचा बाजारभाव पुन्हा ६ हजारांच्या घरात येऊन ठेपला आहे. आज केवळ मेहकर बाजार समितीत सोयाबीनला ७००१ चा कमाल भाव मिळाला आहे. दर चांगला दर मिळतो अशी ख्याती असलेल्या अकोला बाजारात कमाल भाव ६५०० मिळालेला आहे. मागील आठवड्यात हाच भाव ७ हजारांवर होता. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 12 हजार पोत्यांची आवक झाली होती. सोमवारपासून नियमित सोयाबीनचे सौदे आणि बियाणासाठीच्या सोयाबीनचे सौदे हे वेगवेगळे होण्यास सुरवात झाली आहे.

यामुळं दरात घट
–गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे एकतर स्थिर आहेत किंवा त्यामध्ये घट होत आहे.
— सोयाबीनची मागणी थंडावलेली आहे. शिवाय प्रक्रिया उद्योजक, व्यापारी हे साठाबंदीचा निर्णय मागे घेऊन देखील सोयाबीन खरेदीकडे लक्ष देत नाहीत.
-यंदा प्रथमच उन्हाळी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे भविष्यातही सोयाबीनची टंचाई भासणार नाही ह्याचा विचार बाजारपेठेत होत असल्याने कदाचित दरात वाढ होत नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलेला आहे.
— घटते दर आणि वाढती आवक ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.

आजचे सोयाबीन भाजारभाव 20/12/2021
शेतमाल— जात/प्रत— परिमाण— आवक— कमीत कमी दर— जास्तीत जास्त दर— सर्वसाधारण दर
कारंजा — क्विंटल 4000 5325, 6075, 5750
परळी-वैजनाथ — क्विंटल 300 5751, 6151, 5901
तुळजापूर — क्विंटल 175 6025, 6025, 6025
मोर्शी — क्विंटल 500 5600, 6095, 5847
राहता — क्विंटल 58 5826, 6160, 6000
नागपूर लोकल क्विंटल 587 4800, 6551, 6113
अमळनेर लोकल क्विंटल 155 5600, 5800, 5800
हिंगोली लोकल क्विंटल 300 5500, 6500, 6000
मेहकर लोकल क्विंटल 1160 5500, 7001, 6500
ताडकळस नं. १ क्विंटल 75 5900, 6100, 6000
अकोला पिवळा क्विंटल 1979 5200, 6500, 5950
चिखली पिवळा क्विंटल 1312 5400, 6300, 5850
भोकर पिवळा क्विंटल 105 4300, 6000, 5150
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 303 5800, 6000, 5900
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1510 5850, 6135, 6050
शेवगाव पिवळा क्विंटल 15 5500, 6000, 6000
परतूर पिवळा क्विंटल 80 5900, 6100, 6025
गंगाखेड पिवळा क्विंटल 39 6150, 6350, 6200
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 17 5800, 6100, 6100
गंगापूर पिवळा क्विंटल 5 5375, 5500, 5400
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 20 5750, 6050, 5900
मुरुम पिवळा क्विंटल 44 5301, 6250, 5775
उमरगा पिवळा क्विंटल 7 5590, 5900, 5800
उमरखेड पिवळा क्विंटल 50 5500, 5800, 5700
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 70 5500, 5800, 5700
बाभुळगाव पिवळा क्विंटल 460 5400, 5855, 5651
पुलगाव पिवळा क्विंटल 54 5575, 6000, 5800
सोनपेठ पिवळा क्विंटल 70 5375, 6110, 6051

Leave a Comment

error: Content is protected !!