राज्यात पावसाचा जोर कमी ; जाणून घ्या कुठे कधी बरसणार पाऊस ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे राज्यात कोकण खान्देशातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे आज बुधवारी राज्यातील कोकणातील रायगड रत्नागिरी ठाणे पालघर मध्य महाराष्ट्रातील नाशिक खानदेशातील धुळे-नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला गुरुवारी जिल्ह्यात हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

राज्यात पावसाचा जोर ओसरला
विदर्भाच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे वायव्य भागात चक्रीय स्थिती असताना काही भागात पाऊस पडत आहे कर्नाटक किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे उत्तरेकडे मान्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर कोठा पासून ते बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागापर्यंत आहे त्यामुळे राज्यात जोर ओसरला आहे.

आज या ठिकणी पावसाची शक्यता

आज (1 सप्टेंबर) पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसत असला तरी अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू आहे. पुराने थैमान घातलेल्या चाळीसगाव, कन्नड भागातही पावसानं काहीशी उघडीप दिली असून या भागातील जीवनमान पूर्ववत होत आहे. पाण्याखाली गेलेले पूलही वाहतुकीसाठी सुरू होत आहेत. असं असलं तरी हवामान खात्यानं 2-3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता कायम आहे.

पुढील तीन तासात मुंबई, ठाणे ,या भागात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने व्यक्त केली असून याबाबतची माहिती हवामान तज्ञ के. एस . होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच कोकण विभागातील मुंबई ,ठाणे ,पालघर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागतही आज पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई हवामान विभागाचा अंदाज काय?
दरम्यान, मुंबई हवामान विभागाने मंगळवारी (31 ऑगस्ट) सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर म्हणाले, “छत्तीसगडवर 30 ऑगस्टला कमी दाबाचे क्षेत्र आहे. 15 अंश उत्तरवर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी IMD पुढील 3-4 दिवसांसाठी काही इशारे देत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणाचाही समावेश आहे.”

Leave a Comment

error: Content is protected !!