मान्सूनची परतीची वाट लांबणीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या राजस्थानातून माघारी परतण्याला अद्यापही पोषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त आणखी काही दिवस लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मान्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळी ठरवण्यासाठी गेल्या वर्षापासून हवामान विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केला आहे. त्यानुसार 17 सप्टेंबर ही मान्सूनच्या राजस्थानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी राजस्थानातून माघारी ची तारीख 11 सप्टेंबर ठरवण्यात आली होती. मान्सूनची संपूर्ण देशातील परतीची सर्वसाधारण तारीख 15 ऑक्टोबर आहे आणखी आठवडाभर पोषक वातावरण होणार नसल्याने त्यानंतर मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची दिशा ठरणार आहे.

वायव्य भारतात असलेल्या पश्चिम राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवासाला सुरुवात होते. यासाठी साधारणतः 1 सप्टेंबर नंतर त्या परिसरात सतत पाच दिवस पाऊस थांबणे, समुद्रसपाटीपासून साधारण दहा पाच ते आठ किलोमीटर उंचीवर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी परिस्थिती असणारे क्षेत्र तयार होणे, तसेच या परिसरातील आर्द्रतेची टक्केवारी चांगलीच कमी होणं असे बदल दिसल्यास मान्सूनचा राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचा समजले जाते.

त्यानंतर देशाच्या उर्वरित भागात मान्सून परतल्याचे जाहीर करण्यासाठी आर्द्रतेत लक्षणीय घट होऊन आणि पाच दिवस पाऊस थांबला. हे वातावरणीय बदल विचारात घेतले जातात. तर मान्सून संपूर्ण देशातून परतल्या तर जाहीर करण्यासाठी एक ऑक्टोबर नंतर दक्षिण द्वीपकल्प कावर वाऱ्यांची बदलती दिशा विचारात घेतली जाते. नौऋत्य मोसमी वारे देशातून परतल्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते

Leave a Comment

error: Content is protected !!