हिंगोलीच्या केळींना थेट इराण, इराक मधून मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात पिकवल्या जाणाऱ्या अनेक अन्नधान्य तसेच फळांना परदेशातून मागणी होत असते. हिंगोली जिल्ह्यात उत्पादित झालेल्या केळांना थेट इराण इराक मधून मागणी आली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी शेतात केळीची लागवड करतात. हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथे राहणाऱ्या सुधाकर नादरे या शेतकऱ्याने पिकवलेली केळी परदेशात जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या शेतात पाच हजार केळींची लागवड केली आहे. मागील काही वर्षांपासून त्यांनी ही बाग लावली आहे.

याबाबत बोलताना नाडरे यांनी सांगितले की, आपल्या देशात केळीला बाजारभाव नसल्यामुळे आम्ही बाहेरच्या देशात केळी पाठवतो. बाहेरच्या देशात केळीला चांगला बाजारभाव भेटल्याने आम्हाला चांगला फायदा होतो असे त्यांनी सांगितले आहे. तेथील अजून काही शेतकरी सुद्धा त्यांची सुद्धा केळी बाहेरच्या देशात पाठवत असल्याचे सांगितले गेले आहे. सुधाकर नादरे त्यांच्या शेतातील केळी इराक, इराण अशा बाहेरच्या देशात पाठवतात.सुधाकर नादरे यांनी असेही सांगितले कि केळी जर उत्तम प्रकारची असेल तरच केळी आपण बाहेरच्या देशात पाठवू शकतो त्यामुळे आम्ही केळीच्या बागेची चांगली काळजी घेतो तसेच उत्तम प्रकारच्या केळी आम्ही पिकवतो

केळींना प्रति क्विंटल १३०० रुपये भाव

जेवढा भाव बाजारात नाही तेवढा भाव आम्हाला असं भेटतो जसे की प्रति क्विंटल १३०० रुपये भावाने आमची केळी जाते असे सांगितले आहे. त्यामुळे गिरगाव गावातील सुधाकर नादरे या शेतकऱ्याचा आदर्श अनेक शेतकऱ्यांनी घेतला असून ते सुद्धा लोक चांगल्या प्रकारच्या केळीचे उत्पादन करून त्याचा सुद्धा माल बाहेरच्या देशात पाठवत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!