जमीन, भूखंडाचे फेरफार लावण्यासाठी पैशाची मागणी ; अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शेतकरी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील पाथरी महसूल मंडळा अंतर्गत असणाऱ्या माळीवाडा सज्जा मधील जमिन व भुखंडाचे कायदेशीररित्या परिपूर्ण कागदपत्रे फेर लावण्यासाठी दिल्यानंतरही फेर लावण्यासाठी आर्थिक स्वरूपाची मागणी करण्यात येत असून पैसे न दिल्यास फेरफार लावण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याने तहसीलदारांसह मंडळ अधिकारी व तलाठी यांची विभागीय चौकशीचे आदेश देण्यात यावेत या मागणीचे निवेदन परभणी जिल्हाधिकारी यांना पाथरी येथील स्थानिक शेतकरी व नागरिकांनी दिले आहे .

पाथरी महसुल मंडळातील शेतकरी व स्थानिक रहिवाशी यांनी जिल्हाधिकारी यांना शुक्रवार 29 एप्रिल रोजी तक्रारीचे निवेदन दिले आहे . यामध्ये पाथरी तहसील मधील माळीवाडा सज्जा अंतर्गत असणाऱ्या जमिन, भुखंड यांचे कायदेशीर खरेदीखत व इतर कागदपत्रे देऊनही फेरफार लावण्यास महसूल विभागाकडून विलंब व त्यात त्रुटी काढल्या जात असुन फेरफार मंजूर करण्यासाठी मानसिक व आर्थिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे . फेरफार लावण्यासाठी आर्थिक स्वरूपाची मागणी करण्यात येत असल्याचे म्हणत या प्रकरणी पाथरीच्या तहसीलदार ,मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी केली आहे . निवेदनावर पाथरी , इंदिरानगर , समर्थनगर येथील रहीवाशी अलोक चौधरी , निलेश कांबळे व किरण आसाराम महाडिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Leave a Comment

error: Content is protected !!