कापसाची दरवाढ खुपतेय कुणाच्या डोळ्यात ? दर नियंत्रणात आणण्याची मागणी, पहा आजचा कापूस बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई

शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचा दर 10 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये मात्र कमालीची नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दर नियंत्रणासाठी आता केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरवात झाली आहे. दर कमी होण्याच्या अनुशंगाने निर्यात बंद करावी, आयातशुल्क कमी करावेत अशी मागणी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता काय भूमिका घेणार याकडे वस्त्रोद्योग आणि देशभरातील कापूस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिक यांच्यामध्ये जे झाले तेच नेमकं आता कापसाच्या बाबतीत होत आहे.

अतिवृष्टीच्या , बोण्ड आळीच्या तावडीतून मोठ्या मेहनतीने शेतकऱ्याने कापसाला जोपसले. आता कुठे चांगला दर मिळत असताना पुन्हा आणखी एक संकट घोंगावते आहे. तामिळनाडूतील कोइमपुरात मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल उद्योग आहेत. वस्त्रद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे मागणी केली होती. मात्र, शेतकऱ्यांसंबंधी कोणत्याही मुद्यावार हस्तक्षेप केला जाणार नसल्याचे सुनावण्यात आले आहे. त्यामुळे या मंत्रालयाकडील दरवाजे बंद झाल्याने कोइमतूर टेक्सटाईल असोसिएशनच्यावतीने केंद्रीय वस्त्रोद्योग पीयूष गोयल यांना कापसाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठीचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यासंदर्भात काय निर्णय घेणार हे महत्वाचे आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन दर नियंत्रणात आणण्याच्या मागणीसाठी येथील उद्योग हे 17 आणि 18 जानेवारीला बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.गेल्या 50 वर्षाच्या तुलनेत यंदाचे दर सर्वाधिक आहेत. 2017 मध्ये कापसाला 4 हजार 320 प्रति क्विंटल दर होता. तर आता 2022 मध्ये 10 हजार च्या वर कापसाचे दर गेले आहेत. केंद्राने घेतलेला निर्णय महत्वाचा ठरणार आहे कारण तो संपूर्ण देशभर लागू होईल.

आजचा कापुस बाजार भाव पहता आज राज्यात सर्वाधिक भाव हा10151 हिंगणघाट येथे मिळाला आहे. त्याखालोखाल पुलगाव येथे 10081. अकोला येथील बोरगाव मंजू इथे 10025,इतका कमाल भाव प्रतिक्विंटल करिता मिळाला आहे. आज सर्वाधिक आवक ही हिंगणघाट इथं झाली आहे ही आवक नऊ हजार 752 क्विंटल इतकी आहे.

आजचे ७/१/२२ कापूस बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2022
SAVNER—-QUINTAL3200950096009550
SAILU—-QUINTAL4237850097009400
KINWAT—-QUINTAL460924594509400
ASHTI-KARANJA—-QUINTAL245930097009600
ASHTI (Wardha)AKH-4 – LONG STAPLEQUINTAL570950098009700
ARVIH-4 – MEDIUM STAPLEQUINTAL1633900099009500
JAMNERHYBRIDQUINTAL156800091008600
AKOLA (Borgaon Manju)LOCALQUINTAL609380100259880
MANWATLOCALQUINTAL4000840098009600
DEULGAON RAJALOCALQUINTAL3000920096709420
KATOLLOCALQUINTAL175800096009000
HINGANGHATMEDIUM STAPLEQUINTAL97528800101519370
PULGAONMEDIUM STAPLEQUINTAL29009000100819600

Leave a Comment

error: Content is protected !!