Deshi Jugaad : स्प्लेंडर गाडीचा बनवला मिनी ट्रॅक्टर; बीडच्या शेतकऱ्याची कमाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये सध्या नवनवीन तंत्रज्ञान (Deshi Jugaad) दाखल होत आहे. तर अनेक शेतकरी आपआपल्या परीने शेतीची कामे सोपी व्हावी. यासाठी काही जुगाड करत, शेतीच्या अवजारांची निर्मिती करत आहेत. अशातच आता बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कामे सोपे व्हावी. यासाठी स्वतःच्या स्प्लेंडर मोटर सायकलाच मिनी ट्रॅक्टर बनवले आहे. या ट्रॅक्टरच्या मदतीने पेरणीपासून ते पिकाला फवारणी करण्याची सर्व कामे होत असल्याने सध्या या जुगाडू ट्रॅक्टरची (Deshi Jugaad) सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.

कमी खर्चात अधिक काम (Deshi Jugaad Splendor Bike Mini Tractor)

बीड जिल्ह्यातील बाप्पासाहेब बावकर असे या शेतकऱ्यांचे नाव असून, त्यांनी जुगाड (Deshi Jugaad) करत हा मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. सध्या शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या बैलांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यातच ट्रॅक्टर घ्यायचा म्हटला तरी लाखोंनी पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बाप्पा बावकर यांनी कल्पकतेतून या मिनी ट्रॅक्टर निर्मिती केली आहे. ज्यामुळे त्यांचा मजुरीवरील खर्च तर वाचतच आहे. याशिवाय ट्रॅक्टर या मोठ्या साधनाऐवजी, गाडीपासून बनवलेल्या छोट्या साधनातून शेतीची कामे देखील कमी खर्चात होत आहे. ट्रॅक्टरला इंधनासाठी मोठा खर्च होतो. त्या तुलनेत मोटारसायकलला खूपच कमी इंधन लागत असल्याचे शेतकरी बावकर सांगतात.

कशी केलीये निर्मिती?

बाप्पा बावकर यांनी खूपच कमी खर्चात आपल्या स्प्लेंडर या दुचाकीमध्ये काही बदल करून, या मिनी ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. यासाठी त्यांनी दुचाकीचे मागील चाक काढून टाकले आहे. याऐवजी त्यांनी मोटर सायकलपेक्षा जाड टायर वापरून, त्याला मागील बाजूस एंगल्स वापरून ट्रॅक्टरचे स्वरूप दिले आहे. या ट्रॅक्टरला त्यांनी सावली देणारे ‘हूड’ देखील बसवले आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्रॅक्टरला अजूनच आकर्षकपणा आला आहे. याशिवाय त्यांनी या ट्रॅक्टरवर औषध फवारणीचा पिस्टन देखील बसवला आहे. मागील बाजूस नांगर जोडले आहेत. या नांगरांच्या माध्यमातून पेरणी आणि मशागतीची कामे करणे त्यांना सोपे जात आहे.

हेही वाचा : शेतकऱ्याने दुचाकीलाच बनवले ट्रॅक्टर; हायड्रोलिक, रिव्हर्स गिअरसह सर्व यंत्रणा! (https://hellokrushi.com/success-story-farmer-made-a-tractor-two-wheeler/)

काय आहे विशेषतः?

बावकर यांनी बनवलेल्या या ट्रॅक्टरची सर्वात मोठी विशेषतः म्हणजे स्प्लेंडर या दुचाकीच्या मशीनमध्ये जुगाड करून तिला रिव्हर्स गिअर सिस्टीम बसवण्यात आली आहे. इंजिनच्या बाजूला या रिव्हर्स गिअरची व्यवस्था करण्यात आली आहे. हा रिव्हर्स गिअर टाकताच ट्रॅक्टर मागील बाजूस हव्या त्या वेगात मिनी ट्रॅक्टरप्रमाणेच फिरवणे सोपे होते. या ट्रॅक्टरची आणखी एक विशेषतः म्हणजे त्याला केवळ तीन चाके असल्याने तो खूप कमी जागेत वळविणे सोपे जाते. ज्यामुळे शेतात पिकांमध्ये मशागतीची कामे करताना, पिकांची तुडवाताडव किंवा पिकांचे नुकसान होत नाही. या ट्रॅक्टरच्या मदतीने एकरभर रानात एक लिटरमध्ये पेरणी, औषध फवारणी आणि मशागतीची कामे करता येतात. ज्यामुळे तो शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त असल्याचे शेतकरी बाप्पासाहेब बावकर सांगतात.

error: Content is protected !!