हॅलो कृषी ऑनलाईन (Deshi Jugad) : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मान्सून (Manson Rain) नेहमीपेक्षा लवकर दाखल झाल्याने अनेकांची पूर्ती तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता १० दिवसांच्या सलग पावसानंतर थोडी उघडीप झाली आहे. अशात प्लास्टिक बॉटल आणि छत्री यापासून एका शेतकऱ्याने बनवलेला जुगाड सोशल मीडियात व्हायरल होतो आहे.
अचानक आलेल्या मान्सूनमुळे अनेकांची शेतातील कामे खोळंबली आहेत. पावसाने सध्या थोडी उघडीप दिल्याने आता शेतीमधील कामांना वेग आलेला आहे. अशावेळी पाऊस आला तर अनेकदा काम मध्येच थांबवावे लागते किंवा भिजत कामे करावी लागतात. शेतात एकट्याने काम करताना छत्री धरून काम करणे शक्य होत नाही. हेच लक्षात घेऊन एका शेतकऱ्याने घरातील जुने प्लास्टिक बॉटल अतिशय कलात्मक पद्धतीने वापरून त्यात छत्रीचा दांडा फिट करण्याची सोया केली आहे. आता या ब्लास्टिक बॉटलचा गोलाकार भाग डोक्यावर टोपीसारखा घातला कि आपोआप त्यावर छत्री धरली जात असल्याने हा जुगाड फायद्याचा बनत आहे.
याबाबतचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याचे कौतुक करत व्हिडीओ ला लाईक केले आहे. सध्या अनेक शेतकरी अशा पद्धतीने उपयोगी असे देशी जुगाड बनवत असतात. तुम्हाला अशा काही कामाच्या वस्तू किंवा देशी जुगाड खरेदी करायचा असेल तर आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi App सरसिग करून ते डाउनलोड करा.