प्रक्रियायुक्त पदार्थांसाठी गव्हाचे तांबेराप्रतिबंधक वाण विकसित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये रब्बी हंगामात गहू हे प्रमुख पीक मानले जाते. मात्र बदलते हवामान सिंचन सुविधा व तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन कमी या प्रमुख अडचणी आजवर राहिल्यात. यावर सातत्याने अभ्यास करून कुंदेवाडी तालुका निफाड येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राने अधिक उत्पादकता आणि तांबेरा प्रतिबंधक वाण विकसित केले आहे. यामध्ये राज्यातील मागणी अभ्यासून पास्ता, शेवया, कुरडया यांसाठी प्रक्रिया योग्य असा बन्सी प्रकारातील एनआयडीडब्ल्यू 1149 हा नवा गहू वाण विकसित केला आहे. पुढील वर्षापासून त्याचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.

अखिल भारतीय समन्वित गहू सुधार प्रकल्पाच्या अनेक चाचण्या येथील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर सुरू असतात. त्याच अनुषंगानं 24 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या या संबंधित वार्षिक बैठकीत डीडब्ल्यू 1149 या बन्सी प्रकारातील वाणाची भारतातील द्वीपकल्पीय विभागासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यासाठी नियंत्रित पाण्याखाली लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. हा पास्ता, शेवया, कुरडया आदींसाठी उपयुक्त असल्याचा परिणाम तपासून याबाबत घोषणा करण्यात आली. या केंद्रीय प्रसारण समितीने त्यावर शिक्कामोर्तब केले असून तो प्रसारीत केला जाणार आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये

— द्विकल्पिय विभागातील जिरायती किंवा एका ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी शिफारस इत बन्सी हे वान आहे.
— हे वाण तांबेरा रोगासाठी प्रतिकारक आहे.
— यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 11.50 टक्के आहे.
— शेवया, कुरडया व पास्ता यासाठी हे वाण उत्तम आहे.
— या वाणाचा पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस इतका आहे.
— याची उत्पादन क्षमता 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्‍टर एका ओलिताखाली इतकी आहे.

दरम्यान पुढील वर्षापासून कृषी संशोधन केंद्र निफाड यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी बीज उत्पादन घेऊन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याकामी केंद्राचे प्रमुख व गहू विशेषज्ञ डॉक्टर सुरेश दोडके, गहू पैदासकार डॉक्टर उदय काचोळे, गहू पैदास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निलेश मगर, कनिष्ठ गहू रोग शास्त्रज्ञ डॉक्टर भानुदास गमे, मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ योगेश पाटील, कीटकशास्त्र सहाय्यक प्राध्यापक भालचंद्र मस्के, कवक शास्त्र डॉक्टर बबन यांच्या टीमनेही कामगिरी केली आहे. यापूर्वी प्रक्रिया योग्य बिस्किट उद्योगासाठी फुले सात्विक हा वाण देण्यात आलाय

Leave a Comment

error: Content is protected !!