महेंद्रसिंग धोनी शेतीत व्यस्त; शेतमालाची करतोय थेट परदेशात विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । भारताचा कॅप्टनकुल महेंद्रसिंग धोनी याने १५ ऑगस्ट २०२० साली त्याच्या क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्ती घेतली आहे. यानंतर धोनी काय करतो आहे, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना सतत लागलेली असते. क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यापासून धोनीने आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालविण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्याने शेतीत लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. धोनी सध्या त्याच्या रांची येथील फार्म हाउस मध्ये सेंद्रिय शेती करतो आहे. आणि त्याच्या शेतात पिकलेल्या फळ भाज्यांना आता ठिकठिकाणाहून चांगली मागणीही येते आहे.

रांची येथील स्थानिक बाजारपेठेत धोनीच्या शेतात पिकलेल्या भाज्यांना चांगली मागणी आहे. वाटाणा आणि टोमॅटोत यासोबत आता त्याच्या सेंद्रिय फ्लॉवरला देखील मागणी वाढते आहे. त्याने निवृत्ती आधीच रांचीतील ध्रुवा येथील सेंभो फार्म हाउस मध्ये शेती करण्यास सुरुवात केली होती. तसेच तो डेअरी व्यवसाय ही करतो आहे. त्याच्या फार्म हाउस वर मोठ्या प्रमाणात फळभाज्यांचे पीक घेतले जाते आहे. तसेच दुधाचेही चांगले उत्पादन होते आहे.

भारताचा हा लाडका क्रिकेटपटू सध्या आपल्या शेतीत व्यस्त आहे. त्याच्या वेगवेगळ्या कृतींनी तो नेहमीच त्याच्या चाहत्यांना आनंदित करत असतो. त्याने त्याच्या भाजी आणि दुग्धउत्पादनाचा ईजा हा ब्रँड बनविला असून सध्या तो चांगलाच चर्चेत आहे. गांडूळखत आणि शेणखत वापरून त्याने सेंद्रिय फ्लॉवरचे  उत्पादन घेतले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!