धुळ्याच्या शेतकऱ्याच्या गव्हाला मिळाला 5 हजार 451 रुपयांचा विक्रमी दर ; रशिया -युक्रेन युद्धाच्या परिणामाचा बोलबाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामात हरभरा आणि गहू पीकाला पोषक वातावरण मिळाल्यामुळे या दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले आहे आहे. सध्याचे बाजारभाव बघता गव्हाला सर्वसाधारण २०००-३००० रुपये प्रति क्विंटलला कमाल भाव मिळत आहे. अशातच रशिया -युक्रेन यांच्या यांच्या युद्धामुळे रशियातून गव्हाची निर्यात बंद झाल्यामुळे भारताला गहू निर्यातीची चांगली संधी मिळेल याचा बोलबाला सर्वत्र आहे. पण आता प्रत्यक्ष बाजारात गव्हाला चांगला दर मिळला आहे. नंदुरबार बाजार समितीत ५ हजार ४५१ रुपयांचा भाव प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. बाजारसमितीच्या आजपर्यंच्या इतिहासातील हा चांगला दर म्हणावा लागेल.

ज्या शेतकऱ्याला हा दर मिळाला तो शेतकरी धुळे जिल्ह्यातील छडबिल येथील आहे. त्याच्या ९७३ या वाणाला ५ हजार ४५१ रुपयांचा भाव प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. त्याने ८ क्विंटल गहू विक्रीस आणला होता. नांदूरबार बाजार समितीबाबत बोलायचे झाल्यास या बाजार समितीत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून गव्हाच्या आवकेला सुरुवात झाली आहे. सध्याच्या आवकेवर नजर टाकल्यास गव्हाची आवक म्हणावी तशी होत नाहीये. मात्र हळू हळू आवकेत वाढ होण्याचा अंदाज आहे. सध्या दिवसाकाठी ४ हजार क्विंटलची आवक होते. त्याकरिता २ हजार २०० ते २४०० रुपयांपर्यंत सर्वसाधारण भाव मिळत आहेत. गुरुवारी मात्र एका शेतकऱ्याच्या ९७३ या वाणाला ५ हजार ४५१ रुपये भाव प्रति क्विंटल साठी मिळाला.

दरम्यान सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गव्हाला मागणी राहिलच अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली आहे. तसेच ही हंगामाची सुरुवात आहे अद्यापही म्हणावी तशी आवक होत नाहीये मात्र आणखी आवक वाढेल आणि दरही वाढण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!