कृषीमालाचा होणार ब्रँड, राज्यात कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार : कृषिमंत्र्यांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आता राज्य सरकारच्या कृषी विभागाने दिली आहे. राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची विक्री मूल्य साखळीच्या बळकटी करणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. कृषी हवामानानुसार विविध पिकांचा क्लस्टर विकसित करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्रालयामध्ये कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मा. बाळासाहेब ठाकरे ग्रामीण व कृषी परिवर्तन प्रकल्प, पंतप्रधान अन्नप्रक्रिया योजना मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना गट शेती योजना यासारख्या योजना राबवल्या जात आहेत. या योजना समन्वयासाठी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. असे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितलं.

कृषिमालाचा महाराष्ट्र ब्रँड विकसित करण्यावर भर

अस्तित्वात असलेल्या कृषिप्रक्रिया सुविधांचे मॅपिंग करून त्यात भर टाकने व उणिवा दूर करण्यासाठी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे. कृषी प्रक्रिया उद्योगाबाबत कौशल्य असलेल्या तज्ञांच्या सेवेचा वापर करून मूल्य साखळी विकसित करताना समन्वय ठेवावा. असे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले. कृषिमालाच्या महाराष्ट्र ब्रँड विकसित करण्यासाठी उत्पादक निहाय मानकर निश्चित करावीत जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या तालुक्यात शहरीकरण झाले. असल्याचे लक्षात घेऊन या भागात कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा ही विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी वापरावी याकरिता विशेष टास्क फोर्सची निर्मिती करावी. उद्योग महामंडळ व कृषी विद्यापीठे यांनी देखील या बाबींकडे विशेष लक्ष देऊन प्रयत्न करावेत असे भुसे यांनी सांगितले.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!