जायकवाडी धरणातून 28,296 क्युसेकचा विसर्ग सुरु ; नादिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या सात दिवसांत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातलाय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. तुफान पावसाने लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. धरणांतल्या पाणी पातळीतही वाढ झालीय. मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण 92 टक्के भरलं आहे. आणखीही आवक सुरुच आहे. जर पाण्याची अशीच आवक सुरु राहिली तर अवघ्या काही तासांत मराठवाडा धरण 100 टक्के भरणार आहे. आज दि.29 सप्टेंबर रोजी ठिक 4.00 वा. जायकवाडी धरणाच्या 18 रायडल गेटमधून टप्प्याटप्प्याने अर्धा फुटावरुन दिड फुट उघडून एकुण 28296 क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला. ताज्या माहीती नुसार तो वाढवून 40 हजार क्युसेक एवढा आता करण्यात आला आहे .अशी माहिती जायकवाडी धरण पूर नियंत्रण कक्ष यांच्याकडून देण्यात आली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावधनता बाळगावी. हे पाणी सोडण्यापुर्वी आधीच जालना व परभणी बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर गोदावरी नदीला पूर परिस्थिती आहे . सकाळी सात वाजता परभणी जिल्ह्यातील मुदगल उच्च पातळी बंधाऱ्यामधून 2 लाख 93 हजार 180 क्युसेक ने पाण्याचा गोदापात्रात विसर्ग चालू होता . आता जायकवाडीच्या पाण्याची यात भर पडणार आहे . तरी जायकवाडी प्रकल्पाच्या खालील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे, विदुयत साहित्य, वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!