बागा जागवण्यापेक्षा तोडलेल्या बऱ्या ; डाळिंबावरील तेल्याने शेतकरी मेटाकुटीला…!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. आधी अतिवृष्टी, ऐन हिवाळ्यात गारपीट आणि पाऊस, ढगाळ वातावरण , दाट धुके या सर्वांचा फटका केवळ हंगामी पिकांना नाही तर फळबागांना देखील बसतो आहे. बदलत्या वातावरणामुळे डाळींब बागा धोक्यात आल्या असून डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला असून बागा तोडण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील डाळिंब बागावर तेल्या रोगाचा कायम प्रादुर्भाव राहिलेला आहे. अल्पावधीतच हा रोग संपूर्ण बाग क्षेत्राला कवेत घेतो. याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी परिणामकारक औषधच उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे तेल्याचा प्रादुर्भाव झाला शेतकरी सांगत आहेत. शेतकरी उत्पादन घेतात आणि थेट बागच तोडतात. वातावरणातील बदलामुळेच याचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे कृषी तज्ञांचे म्हणणे आहे.

तेल्या रोगाची लक्षणे

–डाळिंबावरील बॅक्टेरीयल ब्लाईट रोग म्हणजेच तेल्या हा प्रामुख्याने जिवाणूजन्य असून झॅन्थोमोनास एक्झानोपोडीस पीव्ही पुनीकिया जिवाणूमुळे होतो.
–या रोगास अनु जीव जन्य करपा असे म्हणतात.
–महाराष्ट्रात या रोगाचा शिरकाव रोगग्रस्त कलमांद्वारे झालेला असून या रोगाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम कर्नाटक राज्याच्या सीमेलगतचा भागात डाळिंबाच्या रुबि या जातीवर सर्वप्रथम दिसून आला.
— या रोगामुळे डाळिंबावर तेलकट डाग पडतात. याचा प्रादुर्भाव पाने, फुले खोड आणि फळांवर होतो.

पान:
सुरुवातीस पानावर लहान तेलकट किंवा पाणथळ डाग दिसतात. कालांतराने काळपट होतात व डागा भोवती पिवळे वलय दिसते. तसेच ते मोठे होऊन तपकिरी ते काळे रंगाचे होतात. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठा झाल्यावर पाने पिवळी पडून गळून पडतात.

फुल:
फुलांवर व कळ्यांवर गर्द तपकिरी व काळपट डाग पडतात. पुढे यामुळे फुलांची व फळांची गळ होते.

खोडावरील व फांद्या वरील:
प्रामुख्याने खोडावर व फांद्यांवर सुरुवातीला काळपट किंवा तेलकट डाग गोलाकार दिसतात. खोडावर या डागाणे गर्द लिंग किंवा खाच तयार होते व तेथून झाड मोडते. तसेच फांद्यांवर डागांची तीव्रता वाढल्यावर फांद्या डागा पासून मोडतात.

फळे:
फळावर सुरुवातीला एकदम लहान आकाराचे पाणथळ तेलकट डाग दिसतात.कालांतराने हे डाग तपकिरी काळपट दिसतात व त्यावर भेगा पडतात. फळांवर लहान डाग एकत्र आले की मोठ्या डागात रूपांतर होते. फळांवर या डागांमुळे आडवे उभे तडे जातात. फळांची प्रत पूर्णपणे खराब होते व तडे मोठे झाल्यावर फळे सडतात आणि गळून पडतात.

रोगासाठी कोणत्या बाबी अनुकूल ठरतात

–या रोगाच्या जिवाणूंची वाढ 28 ते 32 अंश सेल्सिअस तापमान तसेच वातावरणातील आद्रता 80 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास झपाट्याने होते.
–बागेत किंवा बागेत शेजारी तेलकट डाग रोगाच्या अवशेष असणे
–बागेत स्वच्छता असणे म्हणजे तणांचे मोठ्या प्रमाणावर वाढ असणे.
–ढगाळ व पावसाळी हवामान, वादळी पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता जास्त असणे.
–रोगग्रस्त बागेतील गुटी कलमांचा वापर.

या रोगाचा प्रसार कसा होतो?

याचा प्रसार प्रामुख्याने बॅक्टेरीयल ब्लाईट ग्रस्त मातृ वृक्षापासून बनविलेल्या रोपाद्वारे होतो. याशिवाय रोगट डागां वरून उडणारे पावसाचे थेंब, पाट पद्धतीने दिलेले ओलिताचे पाणी, निर्जंतुकीकरण करता वापरण्यात येणारी छाटणीची अवजारे, शेत मजूरांचे आवागमन तसेच विविध कीटक आधारे या रोगाचा प्रसार होतो.

Leave a Comment

error: Content is protected !!