फळबागा आणि भाजीपाला पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भाव ; काय कराल उपाय ? वाचा तज्ञांचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या हवामान स्थितीत फळबागांमध्ये विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. तर पालेभाज्यांवर देखील विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येतोय. अशावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी : केळी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. नविन लागवड केलेल्या केळी बागेत 13:00:45 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

द्राक्ष : द्राक्ष बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. द्राक्ष बागेत पानांची विरळणी करावी व शेंडा खुडावा. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत जिवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

सिताफळ : सिताफळ बागेत आंतरमशागतीच कामे करून तण नियंत्रण करावे. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

Leave a Comment

error: Content is protected !!