पावसाळ्यात जनावरांमध्ये हमखास उद्भवणाऱ्या ‘ या ‘ आजारांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच काळजी घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो पावसाळा सुरु झाला की जनावरांमध्ये काही हमखास आजार उद्भवतात. त्याची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर योग्य उपाय करणे महत्वाचे असते. आजच्या लेखात आपण पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या आजाराविषयी जाणून घेऊया…

१)पोटफुगी

–नवीन उगवलेलं गवत जनावरांनी जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांना पोटफुगीचा त्रास होतो.
— पोटफुगीच्या एका प्रकारात पोटात मोकळी हवा साचून राहते.
— दुसऱ्या प्रकारात हवेबरोबर पाणी पण साचून राहते.
–कोवळे लुसलुशीत गवत जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांना नायट्रेट विषबाधा होण्याचीही शक्यता असते.
— विषबाधेची तीव्रता जास्त असल्यास जनावराला चक्कर येऊन ते खाली पडते.
–पावसाळ्यात जनावरांना डायरिया, जंत प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता असते.

२)कासेचे आजार

–पावसाळ्यात सततच्या ओलसर वातावरणामुळे जनावरांमध्ये कासेचे आजार दिसून येतात.
–धार काढल्यानंतर सडाचे छिद्र जवळपास ४५ मिनिटे बंद होत नाही.
–ओलसर ठिकाणी जनावर बसल्यास दगडीचे जीवाणू या उघड्या छिद्रातून कासेत प्रवेश करतात.
— दगडीमध्ये जनावरांच्या कासेतून लालसर रंगाचे दूध बाहेर येते.
— स्ट्रेप्टोकोकस जीवाणूमुळे संसर्ग झाला असल्यास, कासेच्या खालील बाजूस सूज येते. सडाभोवती माशा बसलेल्या दिसतात. ई.
–कोलाय जीवाणूंचा प्रादुर्भाव झालेला असल्यास जनावरांना खूप जास्त ताप येतो.

३)खुरांचा संसर्ग

–पावसाळ्यात जनावरांचे पाय सतत चिखलात किंवा ओलसर राहिल्याने खुरे नरम पडत असतात.
–नरम पडलेल्या खुरांना जखम फार लवकर होते.
–परिणामी जनावरांना खुरांचा संसर्ग झालेला दिसून येतो.
–खुरांना जखम झाल्याने जनावर लंगडायला लागते.

४) गोचीड
–पावसाळ्यातील वातावरण दमट असल्याने गोचीडांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत असते.
–गोचीडमुळे जनावरांना थायलेरीया, बबेशिया, अनाप्लाझ्मा यांसारख्या आजारांची बाधा होत असते.
–गोचीड प्रादुर्भाव झाल्याने जनावर अस्वस्थ होते.
— गोचीड परजीवी असल्याने जनावरांच्या शरीरातील रक्त पिऊन स्वतःचे पोट भरत असतात.
–त्यामुळे जनावरांना गोचीड तापाची बाधा होत असते.
–तीव्रता जास्त असल्यास जनावरांना रक्ताची कावीळ होत असते.

काय घ्यावी काळजी ?

१)जनावरांना पोटाचे आजार होऊ नये म्हणून पावसाळ्यात उगवलेला हिरवा चारा अधिक प्रमाणात खाण्यास देऊ नये.
२)पोटफुगीवरील औषध गोठ्यात आधीच आणून ठेवले पाहिजे.
३)कासेच्या आजारांचे प्रतिबंध करण्यासाठी दूध काढल्यानंतर जनावराला चारा आणि खुराक दिले पाहिजे. परिणामी जनावर उभे राहून खाल्ल्याने सडाच्या उघड्या छिद्रातून जीवाणू आत जाण्यास अटकाव बसतो.
४) दूध काढल्यानंतर सड टीट डीप मध्ये बुडवून घ्यावीत.
५) गोठ्यात दुधाळ जनावरे बांधण्याच्या जागेवर चुन्याची भुकटी पसरवून घ्यावी. जेणेकरून गोठ्याचा परिसर निर्जंतुक राहील.
६) जिवाणूजन्य आजार होऊ नये म्हणून लसीकरण केले पाहिजे.

Leave a Comment

error: Content is protected !!