पोल्ट्री फार्ममध्ये ‘बर्ड फ्लू’ला रोखण्यासाठी असे करा प्रतिबंधात्मक उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘बर्ड फ्लू’ हा एक संसर्गजन्य रोग असून तो सर्व प्रकारचा पक्षांमध्ये संक्रमित होतो. हा रोग एच 5 एन 1 या विषाणूमुळे होतो.

काय असतात बर्ड फ्लूची लक्षणे

– प्रथमता कोंबड्यांचे खाणे पिणे बंद होऊन ते सुस्तवतात
– नाकातोंडातून रक्त मिश्रित श्राव बाहेर येतो
-तोंडाचा व डोक्याचा भाग सुजलेला दिसतो.
-डोळ्याच्या पापण्याच्या आतील भाग लाल होतो वा सुजलेला दिसतो.
– विष्ठा हिरव्या रंगाची होते व पायांना सूज येते.
– पक्षी चालताना अडखळतात. पंख विखूरतात व गळतात. पक्षी निस्तेज दिसतात.
-अंडी उत्पन्न कमी होते.
श्वसनाचा त्रास होतो, शिंका येतात व श्वास घेताना घर घर आवाज येतो.
– श्वास घेण्यास अडथळा येऊन पक्षी दगावतात.

प्रतिबंधत्मक उपाय

बर्ड फ्लूने नियंत्रित जैव सुरक्षाविषयक उपाययोजनांचे कडकपणे पालन केले गेले पाहिजे. पक्षी सध्या संक्रमित नसले तरी सर्व कुकुट पालकांनी आपल्या फार्मवर प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत.

1) कुक्कुटपालनात एक समान वयोगटाचे पक्षी पाळण्याचे धोरण अवलंबावे याला ‘ऑल इन’ ‘ऑल आउट’ उत्पादन प्रणाली म्हणतात. यात एक दिवसाची पिल्ले आणून ती सर्व एकाच दिवशी विकायची.

2) देशी, बॉयलर आणि अंडी देणारे पक्षी जंगली किंवा स्थलांतरित पक्षांच्या संपर्कात येऊ देऊ नयेत.
3) वन्य पक्ष्यांचा वावर असलेल्या व त्यांच्यामुळेच दूषित होण्याची शक्यता असलेल्या पाण्याच्या कोणत्याही स्त्रोतापासून कोंबड्यांना दूर ठेवावे फार्मवर जंगली पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करू नये.
4) केवळ आवश्यक कामगार आणि वाहनांना फार्मवर प्रवेश करण्याची परवानगी द्यावी.

5)फार्मवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छ कपडे आणि निर्जंतुकीकरण याच्या सुविधा पुरवाव्यात फार्मवर प्रवेश करताना व बाहेर पडताना उपकरणे आणि वाहने पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करावे.

6)फार्मच्या कंपन्यातील गेटवर वाहन निर्जंतुकीकरणासाठी व्हेईकल डीप तयार करावे. त्यात पोटॅशियम परमॅग्नेट चे द्रावण भरलेले असावे. फार्म वर येणाऱ्या सर्व वाहनांचे त्या द्रावणातून येतील ते पहावे.

7) संक्रमित परिसरात विषाणूचे प्रमाण कमी होण्याकरिता सोडियम हायपोक्लोराइड दोन टक्के केव्हा फॉर्मेलीन चार टक्के यासारख्या जंतूनाशक फवारणी नियमितपणे कराव्यात. त्यातून निर्जंतुकीकरणाला मदत होते.

८)सात ग्रॅम धुण्याचा सोडा प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिश्रणामध्ये फार्म परिसर, नाले, गावातील गटारी व इतर स्थळांमध्ये फवारणी करावी ही फवारणी दर पंधरा दिवसांनी केल्याने विषाणूंचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

९) अन्य कोणत्याही फार्मवर उपकरणे किंवा वाहने खाद्य पाणी यांची देवाण-घेवाण टाळावे.

१०) अन्न पोल्ट्री फार्मला भेट देणे टाळावे.

Leave a Comment

error: Content is protected !!