घाबरू नका…! पाथरी,मानवत तालुक्यातील ऊस अडीच महिन्यात संपणार : माजी आ. माणिकराव आंबेगावकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे ,परभणी प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील उसाचा पट्टा असणाऱ्या पाथरी व मानवत तालुक्यातील 14 हजार हेक्‍टरवरील ऊसाचे गाळप विविध नऊ कारखाने करीत असल्याने एप्रिल महिन्यापर्यंत दोन्ही तालुक्यात ऊसाचे टिपुरही शिल्लक राहणार नसल्याची आश्वासक माहिती मा . आ. माणिकराव आंबेगावकर यांनी दिली आहे .

माजी आ.आंबेगावकर म्हणाले की ,मानवत 4 हजार हेक्टर , पाथरी तालुक्यामध्ये 10 हजार हेक्टर असा 14 हजार हेक्‍टर क्षेत्रावर ऊस उत्पादकांनी ऊस लावला आहे .सध्या रेणुका शुगर पाथरी प्रति दिवस 1800 टन एवढे गाळप करत आहे . तर लोहगाव येथील लक्ष्मी नृसिंह साखर कारखाण्याची 45 वाहने कार्यक्षेत्रात असून ते दररोज 1100 ते 1200 टन , समृद्धी शुगर 45 वाहनातून दररोज 1200 टनापर्यंत , योगेश्वरी साखर कारखाना लिंबा 1600 टन ,ट्वेंटीवन शुगर सायखेडा पन्नास वाहनातून 1300 टन ,जय महेश माजलगाव 53 वाहनातून 1300 ते 1350 टन ,गंगाखेड शुगर 70 वाहनातून 1700 टन असा ऊस गाळपासाठी नेत आहेत .याशिवाय पूर्णा येथील बळिराजा , सिल्लोड तालुक्यातील साखर कारखाना व कार्यक्षेत्रातील गुळ कारखाने 500 ते 600 टन प्रति दिवस दोन्ही तालुक्यातील ऊस गाळप करत आहेत .त्यामुळे प्रत्येक दिवशी 9 ते 10 हजार टन म्हणजे प्रत्येक महिन्याला 2 लाख 80 हजार ते 3 लाख टन पर्यंत उसाचे गाळप होत आहे .

त्यामुळे सध्या दोन्ही तालुक्यात मिळून 50 ते 60 टक्के ऊस संपला असून येत्या अडीच महिन्यात पाथरी मानवत तालुक्यात उसाचे टिपूर ही शिल्लक राहणार नसून शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असेही आंबेगावकर म्हणाले .सोबतच पुढील हंगामामध्ये माजलगाव तालुक्यात 1250 टन प्रमाणे उस गाळप करणारी 2 गुळ युनिट चालू होणार राहणार असून बोर्डीकर यांचा कारखानाही परभणी जिल्ह्यात सुरू होणार आहे . त्यामुळे सन 2022-23 ऊस हंगामातही शेतकऱ्यांना अडचण येणार नाही .त्यामुळे संभ्रमावस्थेत न राहता व ऊस तोडणी कामगारांच्या हातात यंत्रणा न जाऊ देता विनाकारण ऊस तोडी साठी आवा च्या सव्वा पैसा न देण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले .

Leave a Comment

error: Content is protected !!