द्रवरुप जिवाणू खते शेतीसाठी आहेत उपयुक्त; असे आहेत फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या बहुतांश सर्व खतांची शेतकरी वर्गाला माहिती आहे. दोन्ही हंगामात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण ही खते दिवसेंदिवस जास्त वापरूनही पूर्ण क्षमतेने पिके घेऊ शकत नसल्याने उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसतं नाही. मग पिकांना ते भरपूर प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी काय कराव असा प्रश्न पडला असेल तर उत्तर आहे. पाहुयात जिवाणू म्हणजे काय? त्याचे फायदे व ते कुठे उपलब्ध आहेत याची खास माहीती. Dravarup Jivanu Khate

जिवाणू खत म्हणजे पिकांसाठी उपयुक्त जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये केलेले मिश्रण होय. बियाण्यास बीजप्रक्रिया, रोपास अंतरक्षीकरण किंवा मातीतून वापरल्यास जमिनीतील उपयुक्त जिवाणुंच्या संख्येत वाढ होऊन आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. परिणामी उत्पादनात वाढ होते. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते. जमिन जैविक क्रियाशिल बनते. मुळांच्या संख्येत व लांबीत भरपुर वाढ होऊन मुख्य खोडांपासुन दुरवरील तसेच खोलवरील अन्नद्रव्य, पाणी पिकास उपलब्ध होते. पिकांची रोग व किड प्रतिकार शक्ती वाढते. पिकांना अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करण्यास मदत करतात तसेच जमिनीची नैसर्गिक सुपिकता टिकून ठेवतात. जिवाणू खतांमुळे पिकांना दिलेल्या रासायनिक खतांचा कार्यक्षमरित्या वापर होण्यास मदत होते. Dravarup Jivanu Khate

-द्रवरुप जिवाणू खते शेतकऱ्यांना विक्री करिता वनामकृवि येथे उपलब्ध आहेत….

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातंर्गत असलेल्या अखिल भारतीय मृदा जैव विविधता-जैविक खत प्रकल्पातंर्गत रब्बी हंगामाच्या विविध पिकांसाठी विद्यापीठ उत्पादित उपयुक्त द्रवरुप जिवाणू खते शेतकऱ्यांना विक्री करिता उपलब्ध आहेत. Dravarup Jivanu Khate

जिवाणू खतांमध्ये रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत (पीएसबी), पालाश विरघळविणारे व वहन करणारे जिवाणू खत, जस्त उपलब्धता वाढविणारे जिवाणू खत, रायझोफॉस (भुईमुग व हरभरा पिकांसाठी), अॅझोटोफॉस (गहू, करडई, ज्वारी आदी पिकांसाठी) व नत्र, स्फुरद, पालाश, गंधक आणि जस्त (एनपीके, सल्फर, झिंक) यांचे एकत्रित द्रवरुप जिवाणू खत कापुस, हळद, ऊस, अद्रक, पपई, पेरू, केळी, डाळींब, टरबुज, खरबूज, संत्रा, मोसंबी, फळभाज्या व पालेभाज्या इत्यादी पिकांसाठी रुपये ३७५ प्रति लिटर या माफक दराने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. Dravarup Jivanu Khate

अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ ०२४५२-२२९०००

Leave a Comment

error: Content is protected !!