शेवगा ,हिरवी मिरची , कोबीच्या दरात वाढ , जाणून घ्या फळभाज्यांचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पुण्यातील गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी सात रोजी राज्यासह परराज्यातून विविध शेतमालाची आवक सुमारे 70 ट्रक इतकी झाली. विविध भाजीपाल्यांची आवक मंदावल्याने बटाटा, हिरवी मिरची, सिमला, मिरची, कोबी, शेवगा ,गाजर, मटार आदींच्या दरात वाढ झाली होती इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

परराज्यातून होणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे आठ टेम्पो हिरवी मिरची, तमिळनाडू येथून अवघ्या एक टेम्पो शेवगा, गुजरातेतून एक टेम्पो भुईमूग शेंगा तर मध्य प्रदेशातून लसणाची आठ ट्रक आवक झाली होती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1200 पोत्यांची आवक झाली. फ्लॉवर टेम्पो कोबी व सिमला मिरची प्रत्येकी पाच टेम्पो, गाजर दोन टेम्पो शंभर गोणी, टोमॅटो पाच हजार क्रेट, तांबडा भोपळा आठ टेम्पो तर जुन्या आणि नव्या कांद्याची सुमारे तीस ट्रक आवक झाली होती. तर आग्रा इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागातून बटाट्याचे तीस ट्रक आवक झाली होती.

फाळभाज्यांचे भाव प्रति 10 किलो

कांदा जुना 200 ते 300, कांदा नवीन 100 ते 250, बटाटा 160 ते 200, लसूण 250 ते 750, आले सातारी -150-250, भेंडी 300 ते 350, गवार गावरान पाचशे ते सहाशे, टोमॅटो 300 ते 400, दोडका 300 ते 350, हिरवी मिरची 300 ते 550, दुधीभोपळा 150 ते 200, काकडी 150 ते 200, कारली हिरवी -280-300, पांढरी कारली 200-250, बिट 200-250, घेवडा 500 ते 550 कोहळा 100 ते 150 आर्वी 300 ते 350, गोसावळे 200 ते 250, ढेमसे 250 ते 300 पावटा 500 ते 600, भुईमूग शेंग 350 ते 450, मटार 1600 ते 1800, तांबडा भोपळा 60 ते 100, सुरण 180 ते 200, मका कणीस 50 ते 100 नारळ शेकडा 1000 ते 1600.

Leave a Comment

error: Content is protected !!