100 ते 300 रुपये किलोने विकल्या जातात शेणाच्या गोवऱ्या ; अशा प्रकारे घरबसल्या सुरु करा व्यवसाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो जनावरांचे शेण आणि त्याच्या गोवऱ्या इंधन म्हणून जळणासाठी आजही खेडोपाडी वापरल्या जातात. तसे पाहता शेण म्हणजे निरुपयोगी असेच समजले जाते. पण शेतकऱ्यांनो या शेणाच्या गोवऱ्यांच्या माध्यमातूनही तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलं … खरेतर शेणाच्या गोवऱ्या होळी आणि इतर धार्मिक विधीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. होळीशिवाय इतर दिवशी देखील या गोवऱ्यांना मागणी असते. विशेषतः धार्मिक कामांसाठी याचा वापर केला जातो. मात्र ग्रामीण भागात सहजासहजी वापरल्या जाणाऱ्या गोवऱ्या शहरी भागात मात्र मिळणे अवघड आहे. म्हणूनच हल्ली या गोवऱ्या ऑनलाईन पद्धतीने देखील विकल्या जातात. त्याला किंमतही चांगली मिळते.

गोवऱ्यांचा ऑनलाईन बाजार
आजकाल सगळ्याच वस्तू ऑनलाईन पद्धतीने कोठे आणि केव्हाही मागवता येते. मग अशावेळी शेणाच्या गोवऱ्यांचा देखील ऑनलाईन बाजार भरवला आहे. आज अशा अनेक शॉपिंग साईट्स आहेत ज्यांच्या माध्यमातून लोक गोवऱ्या विकत घेतात. शिवाय या गोवऱ्या वेगवेगळ्या साईझ आणि शेप मध्ये उपलब्ध होतात. त्यातही गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांना अधिक मागणी असते आणि त्याची किंमतही जास्त आहे. अमेझॉन , मेषो, गोशास्त्र ,शुभांजली ,शॉपक्लूज, वेदिक गिफ्ट शॉप, ईबे, अशा ऑनलाईन साईटसवरून या गोवऱ्या विकत घेतल्या जातात.

वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध

या गोवऱ्या वेगवेगळ्या प्रकारातही तुम्ही विकू शकता म्हणजे अगदी नेहमीच्या गोल साईझ मध्ये किंवा त्याशिवाय गोवऱ्यांचे दिवे पणत्या , विविध धार्मिक आकार ,गोवऱ्यांची माळ , गोवऱ्यांची धूप गोळी अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही गोवऱ्या ऑनलाईन विकू शकता. आता किमतीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या गोवऱ्या १००-३०० रुपये किलोपर्यंत विकल्या जातात.या गोवऱ्या विकूनही शेतकरी चांगला पैसे मिळवू शकतात. तुम्हालाही शेणाच्या गोवऱ्यांमधून चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्ही गोवऱ्यांची ऑनलाइन विक्री करून, घरी बसूनही चांगला नफा कमवू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही चांगल्या ऑनलाइन साइटशी संपर्क साधावा लागेल

Leave a Comment

error: Content is protected !!