वसमत बाजार समितीत आजपासून हळदीचे ई- लिलाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: हिंगोली जिल्ह्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इ-नाम अंतर्गत सोमवारपासून लिलावाद्वारे हळद खरेदी केली जाणार आहे. त्यांच्या अनु क्रमांकानुसार आठवड्यातील पाच दिवसांचे हळद खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे. लिलावात सहभागी न होता परस्पर सौदे करून खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्यास कारवाई केली जाणार आहे अशी माहिती बाजार समितीचे सचिव शिंदे यांनी दिली आहे.भावाबाबत वाद निर्माण झाल्यास अंतिम निर्णय बाजार समितीचा राहिल.

बाजार समितीमध्ये जवळपास 180 परवानाधारक खरेदीदार आहे परंतु त्यातील मोजकेच खरेदीदार लिलावामध्ये भाग घेत आहेत. लिलाव पक्षांमध्ये ई -लिलावाद्वारे हळद खरेदी करण्यात येणार आहे. लिलावात भाग न घेता परस्पर सौदे खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचे निदर्शनास आल्यावर अडते खरीदार विरोधात तात्काळ कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे शिंदे यांनी सांगितले आहे.

सोमवार – आडतदार क्रमांक 121 ते 150
मंगळवार- आडतदार क्रमांक 1 ते 30
बुधवार -आडतदार क्रमांक 31 ते 60
गुरुवार -आडतदार क्रमांक 61 ते 90
शुक्रवार -आडतदार क्रमांक 90 ते 120.

Leave a Comment

error: Content is protected !!