E-Peek Pahani : अतिवृष्टी नुकसान पंचनाम्यासाठी ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द : राधाकृष्ण विखे पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनामासाठी असलेली ई- पीक (E-Peek Pahani) पाहणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंचनामे करताना येणारी ही अडचण दूर होत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान ही अट तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे स्थानिक पातळीवर तलाठी कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करावे लागतील मात्र कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही हीच सरकारची भूमिका असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. तसेच शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी ई-पीक (E-Peek Pahani) पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवावा लागतो. ॲपद्वारे पीक नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना मदत होते. ही नोंदणी शेतकऱ्यांनी स्वत:हून करायची आहे. ही नोंदणी थेट लाभाच्या योजनेसाठी आवश्यक आहे. अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई यासह अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंद करणे गरेजेचे आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने पीक विमा (E-Peek Pahani) कंपनी सुरु करुन योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी केली होती. याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र नंतर यामध्ये खासगी कंपन्याचा शिरकाव कसा झाला याची चौकशी आपण करणार आहे. शिवाय शेतकऱ्यांची आणि सरकारची होणारी लूट आणि फसवणूक थांबवण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन पीक विमा योजनेत अमूलाग्र बदल करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!