पुढील 10 दिवसात अंड्याचे दर वाढण्याची शक्यता ; ‘ही’ आहेत करणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीमुळे सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यातही मागील वर्षी पोल्ट्री व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आता यावर्षी पोल्ट्री व्यावसायिकांना कुक्कुटपालनासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. सोयाबीनच्या वाढत्या किमतींचा परिणाम पाहता 1.5 दशलक्ष टन सोयाबीन आयात करण्याचा केंद्र सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असूनही पोल्ट्री उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचे दिसत आहे. महिनाअखेरीस चिकन आणि अंड्याच्या भावात 25 ते 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु जास्त खर्चामुळे चांगले उत्पन्न मिळवू शकणार नाही त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक निराश आहेत.

श्रावणात किमतीत घेत नाहीच

सध्या श्रावण महिना सुरु असल्याने बहुतेक मांसाहार केला जात नाही एरव्ही या महिन्यात मागणी कमी झाल्याने दर कमी होतो. मात्र यावर्षी श्रवणातही दर स्थिर आहेत. श्रावण महिन्यातही किंमतीत कोणतीही घट झालेली नाही. प्रति शेकडा अंड्याचा दर 400 ते 500 रुपये दर आहे.

या कारणामुळे किंमती वाढण्याची शक्यता

– घाऊक बाजारात चिकनची किंमतही 100 रुपये प्रती किलो आहे. कोंबड्यांना पोसण्यासाठी लागणाऱ्या धान्यांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.

– सध्याचे बाजार पाहता, तज्ज्ञ म्हणतात की यावेळी चिकन आणि अंड्यांचा पुरवठा मागणीपेक्षा 20 टक्के कमी आहे. या महिन्याच्या अखेरीस पुरवठ्यात 30 टक्के वाढ होऊ शकते.

– उत्तर प्रदेश पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष नबाब अली अकबर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला सांगितले की, केंद्र सरकारच्या घोषणेनंतरही सोयामील येण्यास एक ते दीड महिना लागेल.

– दरम्यान, धान्याच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोयाबीनच्या किमतीत तीन पटींनी जास्त वाढ झाली असून ती 3500 ते 10000 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. आता याची किंमतीवरच शेतकऱ्याचे उत्पन्न अवलंबून असेल.

– अली अकबर म्हणतात की वाढती मागणी पाहून डझनभर शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये कुक्कुटपालन सुरू केले आहे.

– नवीन कोंबडी अंडी तर देईल, पण त्यांचे वजन कमी असल्याने शेतकऱ्यांना त्यांची योग्य किंमत मिळू शकणार नाही. खरी किंमत दोन महिन्यांनंतरच उपलब्ध होईल.

– कोंबडीला दररोज 210 ग्रॅम धान्य द्यावे लागते. नवीन शेतकरी सुरुवातीला बाहेरून धान्य आणतात, जे कोंबड्यांसाठी जास्त धोकादायक असते, परिणामी, अंड्यांची संख्याही कमी होते. आता मक्याचे भावही वाढून 1800 रुपये प्रति क्विंटल झाले आहे म्हणजेच खर्च पालनाचा खर्च कुठेही कमी होणार नाही. (Egg prices may rise in the next 10 days, know the reason)

Leave a Comment

error: Content is protected !!