Escorts Kubota Sale : जानेवारीमध्ये ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’च्या ट्रॅक्टर विक्रीत 7 टक्क्यांनी घट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अग्रगण्य ट्रॅक्टर निर्माता कंपनी ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ने (Escorts Kubota Sale) आपली जानेवारी 2024 महिन्यामधील ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ कंपनीच्या आकडेवारीनुसार, कंपनीने मागील महिन्यात देशातंर्गत आणि निर्यात विक्री दोन्हीमध्ये घट नोंदवली आहे. जानेवारी 2024 या महिन्यात देशांतर्गत विक्रीत 6.7 टक्के, निर्यात विक्रीत 11.1 टक्के तर एकूण विक्रीत 7.0 टक्के घसरणीचा सामना ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ कंपनीला (Escorts Kubota Sale) करावा लागला आहे.

देशांतर्गत-निर्यात विक्रीत घट (Escorts Kubota Sale In January 2024)

‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ कंपनीच्या (Escorts Kubota Sale) आकडेवारीनुसार, कंपनीने जानेवारी 2024 या महिन्यात देशातंर्गत बाजारात 5,817 ट्रॅक्टर विक्री केले आहे. मागील वर्षी कंपनीने जानेवारी महिन्यात 6,235 ट्रॅक्टरची विक्री केली होती. यावर्षी ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ची देशातंर्गत बाजारातील विक्री 418 ट्रॅक्टर (6.7 टक्के) इतकी कमी झाली आहे. तर कंपनीला निर्यात विक्रीतही जानेवारी महिन्यात घसरणीचा सामना करावा लागला असून, कंपनीच्या निर्यात विक्रीत यावर्षीच्या जानेवारीच्या महिन्यात 11.1 टक्के घसरण नोंदवली गेली आहे. ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ने जानेवारी 2024 या महिन्यात 368 ट्रॅक्टर निर्यात करण्यात यश मिळवले आहे. मागील वर्षीच्या जानेवारीच्या महिन्यात कंपनीला 414 ट्रॅक्टरची निर्यात करण्यात यश मिळाले होते.

हेही वाचा : महिंद्रा ट्रॅक्टरची विक्री 17 टक्क्यांनी घटली; दुष्काळी परिस्थितीचा परिणाम! (https://hellokrushi.com/mahindra-tractors-sales-down-17-january-2024/)

अल्प पावसाचा फटका

‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ने जानेवारी २०२४ या महिन्यात देशांतर्गत आणि निर्यात असे एकूण 6,185 ट्रॅक्टर विक्री केले आहेत. मागील वर्षीच्या जानेवारी 2023 या महिन्यात कंपनीने 6,649 ट्रॅक्टरची विक्री केली होती. अर्थात यावर्षी कंपनीच्या एकूण विक्रीत 464 ट्रॅक्टरने (7.0 टक्के) घसरण नोंदवली गेली आहे. दरम्यान, महिंद्रा कंपनीचाही जानेवारी 2024 मधील विक्री अहवाल नुकताच समोर आला आहे. महिंद्रा कंपनीलाही जानेवारी 2024 या महिन्यात एकूण ट्रॅक्टर विक्रीत १७ टक्क्यांची घट सहन करावी लागली आहे. त्यामुळे एकूणच देशातील काही भागांमध्ये झालेल्या कमी पावसाचा फटका ट्रॅक्टर उद्योगालाही अप्रत्यक्षपणे बसल्याचे पाहायला मिळत आहे.

एस्कॉर्ट्स-कुबोटा लिमिटेड ही (पूर्वीची एस्कॉर्ट्स लिमिटेड) एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कृषी यंत्रसामग्री विशेषतः ट्रॅक्टर, बांधकाम यंत्रे, साहित्य हाताळणी आणि रेल्वे उपकरणे या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत असून, तिचे हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथे मुख्यालय आहे. जगातील 40 हून अधिक देशामध्ये या कंपनीचा विस्तार आहे.

error: Content is protected !!