आजही कापसाचा दर 10 हजारांवर टिकून , पहा कुठे मिळाला किती भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतीविश्वात कापसाच्या दराने यंदा रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. यंदा इतर कोणत्याही कृषिमालापेक्षा कापसाला चांगले दर मिळत आहेत. एव्हढेच नाही तर दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार देऊळगाव राजा इथं कापसाला प्रति क्विंटल साठी दहा हजार 210 इतका कमाल भाव मिळाला आहे. आज देऊळगाव राजा इथं लोकल कापसाची एक हजार क्विंटल इतकी आवक झाली असून याकरिता किमान भाव 9500 कमाल भाव दहा हजार 210 तर सर्वसाधारण भाव नऊ हजार आठशे रुपयांपर्यंत मिळाला. दरम्यान कापसाचे सर्वसाधारण भाव हे आठ हजार ते दहा हजारांच्या दरम्यान आहेत. राज्यातल्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापसाला दहा हजार आणि त्या पेक्षा जास्त भाव मिळत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 22-2-22 कापूस बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/02/2022
सावनेरक्विंटल35009700100009900
आष्टी- कारंजाक्विंटल3409800101509950
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल12939500101009800
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल7509800100009950
जामनेरहायब्रीडक्विंटल33801095799570
मनवतलोकलक्विंटल250081001019010000
देउळगाव राजालोकलक्विंटल10009500102109800
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल50086001020010160
यावलमध्यम स्टेपलक्विंटल349797087908420

Leave a Comment

error: Content is protected !!