आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी; संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गुरूवारी देवेंद्र भुयार यांच्यावर राजू शेट्टी यांनी टीकाही केली. ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला असे राजू शेट्टी म्हणाले.

सोशल मीडियावर पोस्ट

दरम्यान राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना पक्षातून काढताच काही वेळातच देवेंद्र भुयार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. “धन्यवाद’ अशा आशयाचा मजकूर देवेंद्र भुयार यांनी फेसबुक पोस्ट मध्ये केला आहे. देवेंद्र भुयार यांनी धन्यवाद अशा आशयाचा स्टेटस अनेक सोशल मीडियावर ठेवला आहे. अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे संघटनेचं कुठल्याही कामात सहभागी होत नसल्याने त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे.

विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत देवेंद्र भुयार यांचा विजय झाला. त्यांनी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे शेतकरी संघटनेचा एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले. त्यावेळी एका आमदाराला मंत्रीपद मिळावं यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी आग्रह धरल्याचा होता. देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यात आणि पक्षातील वरीष्ठ फळीत खटके उडत होते. आमदार झाल्यानंतर देवेंद्र भुयार यांनी इतर पक्षांशी आपले संबंध वाढवले. भुयार पक्षाला जुमानत नसल्याचे अनेकदा पक्षाच्या लक्षात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खिशाला बिल्ला सुध्दा लावत नसल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घातले.पत्रकार परीषदेत विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा यांनी देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी केली. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मतभेद असल्याचे पहिल्यांदा चव्हाट्यावर आले.

सध्याच वीज बील, कर्जमाफी संदर्भात महाविकास आघाडी विरोधात आंदोलन सुरू केले असता आमदार भुयार कोणत्याही व्यासपीठावर न दिसल्याने त्यांची हकापट्टी करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!