प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 30 जुलैपर्यंत मुदतवाढ द्या ;परभणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे

राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत 30 जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अतिश नाना गरड यांनी केली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचा  (15 जुलै) शेवटचा दिवस आहे, मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही . त्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा भरणापासून वंचित राहात आहेत.या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवून पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळवून द्यावी, जेणेकरून राज्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहनार नाहीत,मागील अनेक दिवसांपासून राज्यात पाऊस संततधार पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी अनेक अडचणी येत आहे.

त्यात दोन दिवसांपासून विमा कंपनीची साईट अत्यंत धिम्या गतीने चालत असल्यामुळे शेतकरी पिक विमा भरण्यास अडचणी सामोरे जावं लागत आहे .आज सगळ्याच सीएससी आपले सरकार केंद्रावर विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी केली होती .शेतकरी आपल्या पिकाचा विमा भरण्यापासून वंचित राहू नये या सर्व बाबीचा विचार करून सरकारने पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना 15 दिवसाची मुदतवाढ द्यावी अशी आग्रही मागणी अतिश नाना गरड यांनी केली आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!