मंडईत मोजावे लागणार जादा पैसे ; भाज्या महागल्या , कोथिंबीर 50, तर मटार 200 रुपये किलो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सणासुदीचे दिवस आहेत मात्र ऐन सणाच्या दिवसांमध्ये रोजच्या आहारात महत्वाच्या असणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी टोमाटो शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकण्याची वेळ आली होती मात्र आता टोमॅटोच्या भावातही तेजी पाहायला मिळत आहे. पुणे मंडई आणि उपनगरात कोथिम्बिरीला तर सोन्याचा भाव आला आहे असे म्हणायला हरकत नाही कारण एका गड्डीचा भाव हा ५० रुपये इतका झाला आहे. तर महिन्याभरापूर्वी १५० रुपये किलो असलेला मटारचा भाव थेट २०० रुपये किलो झाला आहे.

पालेभाजी महागली

खरंतर इतर फळभाज्यांच्या तुलनेत आरोग्यवर्धरक अशा पालेभाज्यांना ग्राहकांनाही अधिक पसंती असते. मात्र याचा पालेभाज्यांचे भाव आता दुप्पट ते तिप्पट झाले आहेत. यापूर्वी १०/१५ रुपयांना मिळणाऱ्या पालेभाज्या आता थेट ४०,५०,६० रुपयांवर पोहचालया आहेत. पुण्यात कोथिंबिरीचा दर हा ५० रुपये गड्डी इतका झाला आहे. तर मेथी ४०-५०, पालक ३०-५० रुपये इतकी महाग झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.

चढ्या दरातच दिवाळी…

तसेच इतर फळभाज्यांमध्ये देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोबी, फुलकोबी हे २०-२५ रुपये पाव किलो दराने विकले जात आहेत. तर टोमॅटो ५० रुपये किलो झाला आहे. वांगी, भेंडी यांचे दरही २०-२५ रुपये पाव झाले आहेत. तर गवार २५-३० रुपये पाव मिळते आहे. त्याशिवाय अशा महागड्या दरातच ग्राहकांना यंदाची दिवाळी काढावी लागणार असे देखील विक्रेत्यांचे मत आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर हे आणखी काही दिवस चढेच राहणार असून मंडईत जाताना थोडे जादा पैसे मोजावे लागणार आहेत यात शंका नाही.

आजचे बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे

अ. क्र. शेतमाल – किमान – कमाल

१) कांदा -६००-२८००(क्विंटल )
२) बटाटा -१०००-१७००(क्विंटल )
३) लसूण -२५००-८५००(क्विंटल )
४) आले -७००-२६००(क्विंटल )
५) भेंडी -२५००-३५००
६) गवार -३५००-७०००
७) टोमॅटो -१५००-३५००
८) मटार -८०००-१५०००
९) फूल कोबी -१०००-२०००
१०) कोबी -४००-१०००
११) ढोबळी -२०००-४०००
१२) काकडी-१०००-२०००
१३) वांगी -२०००-५०००
१४) कारली – १५००-२५००
१५)कोथिंबीर -४००-२५००(शेकडा )
१६) मेथी -२००-२५००(शेकडा )
१७)पालक-७००-१५०० (शेकडा )
१८)कांदापात -६००-२०००(शेकडा )
१८)शेपू -३००-१५०० (शेकडा )

 

Leave a Comment

error: Content is protected !!