शेतकरी मित्रांनो काळजी घ्या…! जनावरांमधून मानवात येतात ‘हे’ आजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रानो आपण आपल्याला गायी म्हैशिंना जीवापाड जपत असतो. मात्र आजच्या लेखात आपण जनावरांपासून मानवाच्यात प्रसारित होणाऱ्या काही आजारांची माहिती घेणार आहोत.

1)काळपुळी— हा आजार प्राणीजन्य पदार्थांचा संपर्क आणि मुख्यत्वेकरून लोकरीच्या कारखान्यातील कामगारांच्या मध्ये दिसून येतो. जनावरांना जिवाणूंची बाधा जमिनीतून तसेच चारा,पाणी आणि पूरग्रस्त भागातून झालेली दिसते.

— या आजाराने जनावरांचा ताबडतोब मृत्यू होतो जनावरांच्या नाकातोंडातून काळसर रक्त आलेलं आढळतं.
— जनावर आजाराने मृत्यू पावल्यास अशा जनावरांना 1. 80 ते 2.10 मीटर खोल खड्ड्यात मीठ आणि चुना टाकून पुरावे.

मानवातील लक्षणे
या आजाराची माणसाला बाधा झाल्यास ताप येतो, डोकेदुखी, घाम सुटणे,शरीरावर पुरळ येणे व शेवटी मृत्यू होतो.

2)लेप्टोस्पायरोसिस— या आजाराचा प्रसार पावसाळ्याच्या सुरुवातीस कुत्रा, मांजर, यांचा मलमूत्र पासून पाणी साठलेल्या डबक्यामध्ये होतो. अशा पाण्याचा माणसाच्या पायांच्या जखमांची संपर्क आल्यास माणसाला त्याचा संसर्ग होतो.
— कुत्र्यांमध्ये आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण होते.

मानवातील लक्षणे
ताप येतो, मळमळते, उलट्या होतात, पोट व अंग दुखते, खोकल्यातून रक्त पडते, डोळे सुजतात, कातडीवर लहान वर्ण उमटतात.

3) अँड्यूलेटिंग फिव्हर— हा आजार घातक आहे. या आजाराची बाधा झाल्यास जनावर आठ ते नवव्या महिन्यात गाभडतात. झार पडत नाही.
— या आजाराची व नियंत्रणासाठी प्राण्यांसाठी लस उपलब्ध आहे.

मानवातील लक्षणे

— जनावरांचे कच्चे दूध किंवा संपर्कातून माणसांना हा आजार होतो
— कमी न होणारा ताप, सांधेदुखी वांझपणा इत्यादी लक्षणे आढळतात.

4) क्षयरोग किंवा टी.बी.— बाधित जनावरांच्या दुधातून किंवा संपर्कात असून हा रोग होतो. आजार झालेल्या माणसांना सतत ताप येतो, अशक्तपणा, खोकला अशी लक्षणे दिसतात.
— दिवसेंदिवस वजन कमी होते.

5) नायटा–हा एक बुरशीजन्य त्वचा आजार आहे. हा आजार जनावरांना होतो.
— आजारी जनावरांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांना हा त्वचेचा आजार होतो.

6) धनुर्वात— आजाराचे जंतू मातीमध्ये, गंजलेल्या अवजारावर आढळतात.
— जखमेशी संपर्क आल्यास आजार होतो.
7) खरूज
— आजार प्रामुख्याने कुत्रा आणि इतर जनावरांना होतो.
— आजाराचा प्रादुर्भाव लहान मुलं किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांना होतो. त्यामुळे अशा जनावरांच्या संपर्कात येऊ नये तात्काळ उपचार करावा.

प्रतिबंधक उपाय योजना–आजाराचा प्रसार डास, माशा, गोचीड, पिसवा, उंदीर विविध कीटक गोगलगायी मार्फत होतो. या सर्वांच्या वाढीचे ठिकाणी वेगवेगळे आहे. गटार शेण, उकिरडे, कुजलेले अन्न वेळेवर नष्ट करावे.

— वैयक्तिक स्वच्छता, रोगनिदान त्यावर योग्य उपचार,वातावरणाची स्वच्छता,जनावरांचे लसीकरण, अन्नपदार्थाची योग्य स्वच्छता, आरोग्य प्रबोधन आणि पशु तज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!