हॅलो कृषी ऑनलाईन | शोधायला गेले तर अनेक पर्याय उपलब्ध होत असतात. याचे एक वास्तव उदाहरण ओडीसा मधील एक शेतकऱ्याने दिले आहे. त्याच्या शेतात पाणी आणण्यासाठी त्याने अशी काही युक्ती केली आहे, की त्याच्या या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होते आहे. ओडीसातील मयूरभंज जिल्ह्यातील बदामतिलिया गावातील शेतकरी माहूर तीपिरिया असे या शेतकऱ्याचे नाव असून, बांबू आणि प्लास्टिकच्या बाटल्या यांच्या सहाय्याने त्याने आपल्या शेतात नदीतील पाणी नेले आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारे विद्युत प्रवाहाचा वापर करण्यात आलेला नाही. नैसर्गिक उर्जेचा वापर करत कसल्याही प्रकारचे शिक्षण न घेतलेल्या या व्यक्तीने प्रदूषण विरहीत पाणी उपसा करण्याचे यंत्र विकसित केले आहे. ज्या माध्यमातून ते नदीपासून २ किलोमीटर दूर असणाऱ्या आपल्या शेतात थेट पाणी नेतात.
हायटेक शेती करून असा कमवा दुप्पट नफा
शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती या अँपवर आहे. तसेच कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती यावर दिली जाते. तसेच सातबारा, जमिनीचा नकाशा सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतो. रोजचा बाजारभाव इथे समजतो. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही या अँपच्या माध्यमातून करता येते.
माहूर यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा नैसर्गिक रित्या वापर केला आहे. त्यांनी एक चक्र बनवले आहे. ज्याच्यावर प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्या लावल्या आहेत. आणि बांबूच्या सहाय्याने आपल्या शेतापर्यंत एक लाईन नेली आहे. ते चक्र नदीमध्ये बसवले आहे. ते चक्र जसे फिरते तसे एक एक बाटलीमध्ये पाणी साठते. हे साठलेले पाणी चक्र जसे वर जाते तसे एका पत्र्यावर पडते. या पत्र्याची दिशा बांबूच्या लाईनला जोडली आहे. म्हणजे पत्र्यावर पडलेले पाणी थेट बांबू मध्ये जाते. आणि बांबू तील पाणी शेताच्या दिशेने जाते. अशा पद्धतीने या अनोख्या पाणी उपसा तसेच सिंचन पद्धतीमुळे हे यंत्र आता सर्वांच्या आकर्षणाचा विषय बनले आहे.
सध्याच्या काळात प्रदूषण खूप गंभीर समस्या झाली आहे. वाढत्या इलेक्ट्रिक साधनांमुळे निसर्ग धोक्यात आला आहे. अशा छोट्या छोट्या कृतीतून आपण निसर्ग नक्की वाचवू शकतो. माहूर यांचा हा प्रयोग कौतुकास्पद आहे. कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसताना विजेचा कोणताही वापर न करता त्यांनी बनवलेले हे यंत्र निसर्गास पूरक असे आहे. यामुळे निसर्गाची कोणतीच हानी होत नाही आणि दिवसेंदिवस ज्याची चिंता भेडसावते आहे त्या पारंपारिक उर्जेची बचतही होते आहे. अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण आणि निसर्गास पूरक प्रयोग होणे आता काळाची गरज आहे.